एल्गार परिषद प्रकरण : आरोपी ज्योती जगतापच्या जामीन अर्जाला एनआयएचा विरोध

143

एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणात अटक करण्यात आलेली कार्यकर्ती ज्योती जगताप हिने तिच्यावर खोटा आरोप करण्यात आला आहे, असे सांगत जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) तिच्या याचिकेला विरोध केला. ज्योती जगताप या शहरी भागात बंदी घालण्यात आलेल्या सीपीआय (माओवादी) च्या कारवाया पसरवत होती.

शस्त्रे आणि स्फोटके वापरण्याचे प्रशिक्षण घेतले 

न्यायालयात एनआयएने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, जगताप ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (माओवादी) सक्रिय सदस्य होती, ती बंदी घातलेल्या ‘दहशतवादी गट’चा शहरी भागात प्रसार करत होती, तिने शस्त्रे आणि स्फोटके वापरण्याचे प्रशिक्षण घेतले होते. जगताप यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने हे प्रकरण दोन आठवड्यांनंतर सुनावणीसाठी ठेवले आहे. जगताप हिने ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेमध्ये दलितांना एकत्रित करण्यासाठी प्रयत्न केले होते. सरकारचा निषेध करण्यासाठी आणि सरकारविरोधात द्वेष निर्माण करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

(हेही वाचा आमदार अमोल मिटकरींच्या अडचणी वाढणार, ‘त्या’ तीन महिला कोण?)

एल्गार परिषदेत गाणी आणि प्रक्षोभक घोषणा दिल्याचा आरोप 

१ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे हिंसाचाराला चालना देणार्‍या या परिषदेमध्ये चिथावणीखोर भाषणे करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी या परिषदेला माओवाद्यांचे समर्थन असल्याचा दावा केला होता. कबीर कला मंच गटाच्या इतर सदस्यांसह एल्गार परिषदेत गाणी आणि प्रक्षोभक घोषणा दिल्याचा तिच्यावर आरोप आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार, कबीर कला मंच हा बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) या दहशतवादी संघटनेचा गट आहे. जगताप हिला सप्टेंबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून ती मुंबईतील भायखळा महिला कारागृहात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.