टेस्लाचे सीईओ एलाॅन मस्क यांनी ट्वीटर कंपनी विकत घेतली आहे. 44 अब्ज डाॅलरमध्ये हा करार करण्यात आला आहे. एलाॅन मस्क हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी ट्विटरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर, ट्वीटर विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मस्क यांनी प्रति शेअर 54.20 डाॅलर या दराने ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली होती.
गेल्या काही दिवसांपासून एलॉन मस्कच्या ऑफरवरून ट्विटरच्या बोर्डमध्ये चर्चा सुरू होती. किंबहुना, एलॉन मस्क यांचे मत आहे की, ट्विटरचा वापर मुक्त संभाषणासाठी करण्यासाठी ट्विटर खासगी असणे गरजेचे आहे.
एलाॅन मस्क यांचे ट्वीट
ट्विटरच्या बोर्डाने सोमवारी रात्री ही ऑफर स्वीकारली आहे. ट्वीटरवरुन माहिती देताना, टेस्लाचे सीईओ एलाॅन मस्क यांनी अखेर ट्वीटर विकत घेतल्याची पुष्टी केली आहे. दरम्यान, टेस्लाचे एलाॅन मस्क यांचे आणखी एक ट्वीट व्हायरल होत आहे, त्यानुसार मस्क ट्वीटर खरेदीचा अंतिम करार होण्याची शक्यता असल्याचे समजत होते. मला आशा आहे की माझ्या वाईट टीका अजूनही ट्वीटरवर राहतील, कारण माझ्या मते यालाच खरे बोलण्याचे स्वांतत्र्य म्हणतात, असे मस्क यांनी ट्वीट करत म्हटले आहे.
🚀💫♥️ Yesss!!! ♥️💫🚀 pic.twitter.com/0T9HzUHuh6
— Elon Musk (@elonmusk) April 25, 2022
( हेही वाचा: काॅल रेकाॅर्ड करताय? तर हे जाणून घ्या… )
आधी ऑफर नाकारली होती
एलाॅन मस्क मागील काही काळापासून सतत ट्वीटरचे शेअर्स खरेदी करत होते. त्यानंतर त्यांनी थेट ट्वीटरच्या संचालक मंडळाला ट्वीटर विकत घेण्याची ऑफर दिली. त्यावेळी ट्वीटरमध्ये गुंतवणूक केलेले सौदी अरेबियाचे प्रिन्स अल वलीद बिन तलाल अल सौद यांनी ट्वीट करुन एलाॅन मस्क यांची ऑफर नाकारली होती.