एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय! १५० कोटी Twitter युजर्संना बसणार ‘हा’ फटका

135

ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर ट्वीटरचे नवे सीईओ एलॉन मस्क यांनी घेतलेल्या निर्णयामुळे ते चर्चेत आहेत. आता एलॉन मस्क आणखी एक मोठे पाऊल उचलणार आहेत. नुकतीच मस्क यांनी ट्विटरवरून तब्बल १५० कोटी ट्विटर अकाऊंट कायमची हटवण्याची घोषणा केली आहे. मस्क यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली, थोडे थोडके नव्हे तर तब्बल १५० कोटी म्हणजे साधारण दीड अब्ज अकाऊंट हटविण्यात येणार आहे.

(हेही वाचा – ऑनलाईन व्यवहार करताय? UPI पेमेंटसाठी आता Paytm, GPay, PhonePe वर मर्यादा; किती असणार लिमिट?)

अनेक वर्षांपासून या प्लॅटफॉर्मवर निष्क्रिय असलेली साधारण १५० कोटी अकाऊंट लवकरच डिलीट केली जातील, असे मस्क यांनी सांगितले. सध्या ट्विटरवर असे अनेक अकाऊंट आहेत, जे तयार केल्यानंतर वापरलेच गेले नाहीत. तर अनेक अकाऊंट असे आहेत की, ते सुरू केल्यानंतर एकदाच लॉग इन करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने निष्क्रिय अकाऊंट डिलीट केल्यामुळे नेम स्पेस मोकळी होईल. एखाद्याला एक विशिष्ट युझरनेम हवे आहेत, मात्र ते कोणी आधीच घेतलेले आहे आणि त्याचा वापरच होत नाही, असे अकाऊंट डिलीट केल्याने ते नाव उपलब्ध होईल.

ट्विटरवर अधिक जागा उपलब्ध करण्यासाठी मस्क यांनी हा निर्णय घेतला आहे. अलिकडेच मस्क यांनी ट्विटर अकाऊंटची अद्यावत स्थिती दर्शवणारे एक सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे खोट्या नावाने सुरू असलेल्या अकाऊंटची माहिती मिळणार आहे. त्यामुळे अशी खाती हटवणे सोपे होणार असल्याचेही मस्क यांनी म्हटले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.