ट्विटरचे नवीन मालक, एलॉन मस्क यांनी शुक्रवारी घोषणा करताना 2 डिसेंबर, म्हणजेच शुक्रवारी ते ‘व्हेरिफाईड’ नावाचे नवे व्हेरिफिकेशन फीचर लॉन्च करणार असल्याची माहिती दिली आहे. कंपन्यांसाठी गोल्डन टिक, सरकारसाठी ग्रे टिक, व्यक्तींसाठी ब्लू टिक असे फिचर तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या फीचर होण्यापूर्वी सर्व व्हेरिफाईड अकाऊंटची सत्यता पडताळणी देखील केली जाणार आहे.
(हेही वाचा – … म्हणून पुणे स्टेशन ते पारगाव PMPML ची बससेवा बंद न करण्याची होतेय मागणी)
मस्क यांनी या नव्या फीचरला लाँच करताना उशीर झाल्याबद्दल युजर्सची माफी मागितली आहे. पुढील आठवड्यात शुक्रवार 2 डिसेंबर रोजी व्हेरिफाईड फीचर लाँच करत असल्याचे त्यांनी सांगितले. बनावट अकाउंट्समुळे कंपनीने नुकतीच जाहीर केलेली 8 डॉलर ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा बंद केली होती आणि मागणीनुसार ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा 29 नोव्हेंबर रोजी पुन्हा सुरू केली जाईल, असे सांगितले. पण नंतर ब्लू टिक सबस्क्रिप्शनच्या री-लाँचवरही बंदी घालण्यात आली. आयकॉनिक ब्लू टिक मार्क पूर्वी राजकारणी, सेलिब्रिटी, पत्रकार आणि इतर सार्वजनिक व्यक्तींच्या व्हेरिफाईड अकाऊंटसाठी राखीव होते.
युजर्ससाठी मोठा निर्णय
एलॉन मस्कने ट्विटरवर बॅन केलेले अकाउंट असलेल्या युजर्ससाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता मस्क बॅन केलेले अकाउंट पुन्हा सुरू करणार आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर हँडल पुनर्संचयित केल्यानंतर, इतर बॅन केलेले अकाउंट माफ करून त्यांचे पुनर्संचयित करणे सुरू केले जाणार आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी मस्क यांनी मतदान करून लोकांचे मत विचारले होते. 24 नोव्हेंबर रोजी मस्क यांनी लोकांची मतं विचारात घेतली. ज्यात ट्विटरने सस्पेंड केलेल्या अकाऊंटला माफी द्यावी का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर 72.4% लोकांनी होय असे उत्तर दिले.
Join Our WhatsApp Community