बकरीच्या शरीरावर Twitter च्या एलॉन मस्कचं डोकं! काय आहे नेमका प्रकार?

173

ट्विटरचे मालक बदलल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा आहे ती बनलेले नवे मालक एलॉन मस्कची. अशातच मस्क यांच्या चाहत्यांनी त्याचा हिरोसमान असलेल्या मस्कचे तब्बल ३० फूट लांबीचे स्मारक उभारले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहा लाख डॉलर्सची ही कलाकृती ५ फूट ९ इंच लांबीची आहे. रॉकेटवर उभं असलेल्या बकऱ्याच्या शरीरावर या सगळ्यात श्रीमंत माणसाचे डोकं लावल्याच्या स्मारकाचे फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे.

(हेही वाचा – MSRTC: शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना शिंदे-फडणवीसांकडून दिलासा)

केव्हिन आणि मिशेल स्टोन या कॅनेडियन धातूच्या शिल्पकारांनी ॲल्युमिनियमपासून हे शिल्प तयार केल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर रोजी टेक्सासमधील ऑस्टिन मधील टेस्ला येथील त्यांच्या मुख्यालयात मस्क यांची पुतळ्याची ओळख करून देण्यासाठी एलॉन गोट टोकन यांनी ही योजना आखली होती.

एलॉन गोट टोकन यांनी एका निवदेनात असे म्हटले की, बहुतेक लोकांना वाटले की, आम्ही हे कधीही करणार नाही, परंतु वर्षभरानंतर हा पुतळा एलन मस्कच्या घरी आणण्याची वेळ आली आहे. आम्हाला हा पुतळा भेटून त्यांना द्यायचे आहे. आम्ही एलन मस्क यांच्या कर्तृत्वाच्या आणि क्रिप्टोकरन्सीच्या वचनबद्धतेच्या सन्मानार्थ सेमी ट्रेलरच्या मागील बाजूस सहा लाख डॉलर्सचे हे स्मारक बांधल्याचीही माहिती या निवेदनात देण्यात आली आहे. दरम्यान, ट्विटरचे नवे सीईओ म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर एलॉन मस्क यांनी पे फॉर व्हेरिफिकेशन प्रणाली अधिकृतपणे सुरू केली आहे. कारण कंपनीच्या मते काही युजर्स ज्याचे याचे उल्लंघन करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.