ट्विटर कंपनीत एलॉन मस्कच्या एन्ट्रीनंतर कंपनीमध्ये बरेच बदल झाले आहेत. एलॉन मस्क आपल्या धोरणांसह ट्विटर पूर्णपणे बदलण्याच्या निर्णयात गुंतले आहे. मात्र त्याचा थेट परिणाम ट्विटरच्या कर्मचाऱ्यांवर होत आहे. एलॉन मस्कच्या ‘हार्डकोर वर्क’ अल्टिमेटमनंतर आता शेकडो कर्मचाऱ्यांनी स्वतःहून कंपनीकडेच आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत. यामुळे ट्विटरला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
(हेही वाचा – ISRO ने रचला इतिहास; पहिले खासगी राॅकेट विक्रम-S लाॅंच, ‘ही’ आहेत वैशिष्ट्य)
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी एलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला होता. ईमेलद्वारे, या नव्या मालकाने कर्मचाऱ्यांना सांगितले की, ‘ट्विटर यशस्वी करण्यासाठी आम्हाला खूप कट्टरतावादी बनण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी त्यांनी ईमेलमध्ये हार्डकोर वर्क म्हणजेच जास्त तास काम करण्याचा उल्लेखही केला. या ईमेलचा कर्मचाऱ्यांवर सर्वाधिक नकारात्मक परिणाम झाल्याचे सांगितले गेले. कर्मचार्यांना गुरुवारीच्या अखेरीस मस्क यांचा ऑनलाइन फॉर्म भरण्याचा पर्याय दिला होता, अन्यथा त्यांना कंपनी सोडण्याचा निर्णय द्यावा लागणार होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत किती कर्मचाऱ्यांनी ट्विटर सोडले आहे हे स्पष्ट झालेले नाही. परंतु तीन ट्विटर कर्मचाऱ्यांनी व्यावसायिक सूडाच्या भीतीने ही कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरमधील एका अभियंत्याने सांगितले की, “पायाभूत सुविधांचे प्रतिनिधित्व करणारी संपूर्ण टीम स्वतःहू ट्विटर कंपनी सोडत असून राजीनामा देत आहोत.”
Join Our WhatsApp Community