2022 मध्ये झालेल्या मोठ्या तोट्यामुळे ट्वीटर, टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलाॅन मस्क जगातील अब्जाधीशांच्या यादीत दुस-या क्रमांकावर घसरले होते. आता मात्र, पुन्हा एकदा एलाॅन मस्क यांनी आपल्या नावाचा जगात डंका वाजवला आहे. गेल्या दोन महिन्यांत टेस्लाच्या शेअर्समध्ये 90 टक्क्यांनी झेप घेत एलाॅन मस्क पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
मागच्या वर्षी बर्नार्ड अरनाॅलटने एलाॅन मस्कला मागे टाकले होते. कारण एलाॅन मस्क यांची संपत्ती 200 अब्ज डाॅलरच्या खाली गेली होती. 2022 वर्ष हे मस्कसाठी खूप वाईट ठरले असून 44 अब्ज डाॅलरच्या ट्वीटर डीलच्या सुरुवातीपासून त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये जोरदार घसरण सुरु झाली होती. दरम्यान, गेल्या वर्षी एलाॅन मस्कने सर्वाधिक संपत्ती गमावली, पण त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीपासून कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे त्याच्या संपत्तीमध्ये वाढ झाली.
( हेही वाचा: महापालिकेच्या त्या डॉक्टरांचे सेवा निवृत्तीचे वय वर्षे ५८. . .६०. . . ६२. . . नंतर आता ६४! )
गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांचा क्रमांक कितवा
भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांनी टाॅप-10 मध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे. तर 81.1 अब्ज डाॅलर्सच्या संपत्तीसह, रिलायन्सचे चेअरमन जगातील 10 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर हिंडेनबर्गच्या भोव-यात अडकलेले गौतम अदानी 37.8 अब्ज डाॅलर्सच्या संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत 32 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत.