…तर ट्वीटर खरेदी करणार नाही; एलाॅन मस्क यांची धमकी

ट्विटर त्याच्या बनावट (स्पॅम बाॅट) खात्यांची माहिती आपल्याला देण्यास नकार देत असल्याचा आरोप करुन ही कंपनी खरेदी करण्याचा 44 अब्ज अमेरिकी डाॅलरचा करार रद्द करण्याची धमकी एलाॅम मस्क यांनी दिली आहे.

टेस्ला व स्पेसएक्स कंपन्यांचे सीईओ असलेल्या मस्क यांच्या वकिलांनी सोमवारी ट्विटरला लिहिलेल्या पत्रात ही धमकी दिली आहे. ट्विटरने हे पत्र सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज कमिशनकडे सादर केले.

काय म्हटलंय पत्रात 

ट्विटरच्या 229 दशलक्ष खात्यांपैकी किती खाती बनावट आहेत याचे मुल्यमापन करता यावे म्हणून, ही कंपनी खरेदी करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर, एक महिन्याने म्हणजे 9 मे पासून मस्क या समाजमाध्यमाकडे ही माहिती मागत आहेत, असे या पत्रात म्हटले आहे.

( हेही वाचा: RSS: आरएसएसची सहा कार्यालये बाॅम्बने उडवण्याची धमकी )

ट्विटरच्या पद्धती ढिसाळ

ट्विटरने केवळ कंपनीच्या चाचणी पद्धतीचे तपशील पुरवण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र हे मस्क यांच्या विनंतीला नकार देण्यासारखे आहे, असे वकिलांनी नमूद केले. ट्विटरच्या पद्धती ढिसाळ असल्याचे मस्क यांचे म्हणणे आहे. ट्विटरचा अलिकडचा पत्रव्यवहार लक्षात घेता, ही कंपनी एप्रिलमध्ये झालेल्या करारांतर्गत असेलला अधिकार निष्फळ ठरवत असल्याचेही वकिलांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here