आता एलॉन मस्क परफ्यूम विकणार? काय आहे कारण? नाव अन् किंमत ऐकून…

118

जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीवर परफ्यूम विकण्याची वेळ आली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मालक एलॉन मस्क आता सेल्मन बनले असल्याची चर्चा सध्या सोशल मिडीयावर सुरू आहे. कारणही तसेच आहे, कारण एलॉन मस्क यांनी स्वतःला सेल्समन असे म्हटले आहे. एलॉन मस्क यांनी त्यांच्या ट्वीटर बायोमध्ये बदल करून स्वतःला परफ्यूम सेल्समन असे म्हटल्याचे दिसतेय.

(हेही वाचा – मेटा सीईओ मार्क झुकरबर्गसह अनेक युजर्सचे फॉलोवर्स झाले कमी, काय आहे कारण?)

यासह एलॉन मस्क यांनी एक ट्वीट देखील केले आहे. यामध्ये त्यांनी एका परफ्यूमच्या बॉटलचा फोटो पोस्ट केला असून त्याला पृथ्वीवरील सर्वोत्तम सुगंध! असे कॅप्शनही दिले आहे. मस्क यांनी त्यांच्या बायोमध्ये परफ्यूम सेल्समन असे नमूद केल्याने आता एलॉन मस्क परफ्यूम विकणार का? अशा चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर यामुळे एलॉन मस्क सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आले आहे.

एलॉन मस्क यांनी Burnt Hair नावाचा परफ्यूम बाजारात आणला असून त्याची किंमत १०० डॉलर म्हणजे ८,४०० रुपये आहे. इतकेच नाही तर या परफ्यूमचे मस्क यांनी कौतुक केले आहे. तर तो पृथ्वीवरील सर्वात सुंदर परफ्यूम असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, हा Burnt Hair नावाचा परफ्यूम ‘द बोरींग कंपनी’ या ब्रँडचा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.