एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून अनेक मोठे बदल केले आणि निर्णयही घेतले तेव्हापासूनच ते चर्चेत आहेत. अशातच ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांच्या नव्या ट्विटने मोठी खळबळ माजली आहे. मस्क यांनी पोल घेत नेटकऱ्यांना विचारले की, मी ट्विटरच्या प्रमुखपदावरून (सीईओ) पायउतार व्हावे का? मी या मतदानाच्या निकालांचे पालन करीन. या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी ट्विटरवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. आतापर्यंत मस्क यांच्या या ट्विटरपोलवर एक कोटीहून अधिकांनी मतदान केले आहे. ज्यामध्ये 57 टक्के लोकांनी मस्क यांनी राजीनामा देण्याचं समर्थनार्थ मतदान केले आहे.
(हेही वाचा – विश्वविजेता अर्जेंटिना आणि इतर संघांवरही FIFA कडून बक्षिसांची लूट; कोणाला किती मिळणार Prize Money?)
गेल्या काही दिवसांपूर्वी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतले. यानंतर अनेक निर्णय घेतले तर मस्क यांनी हजारो कर्मचाऱ्यांची कपातही केली. मस्क यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मस्क यांच्याविरोधात जगभरातून टीकेची झोड उठवली होती. दरम्यान मी ट्विटरच्या सीईओ पदावरून राजीनामा द्यायला हवा का? असा थेट प्रश्न मस्क यांनी ट्विटरवरून विचारला आहे. या विचारलेल्या प्रश्नावरून एकच खळबळ उडाली आहे. ते खरंच राजीनामा देतात का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Should I step down as head of Twitter? I will abide by the results of this poll.
— Elon Musk (@elonmusk) December 18, 2022
मस्क यांनी ट्विटरवर एक नवीन पोल सुरू केला आहे. याच माध्यमातून त्यांनी हा प्रश्न थेट नेटकऱ्यांना विचारला आहे. लोक जी भूमिका घेतील त्याचे मी पालन करणार असल्याचे मस्क यांनी जाहीर केले आहे. मस्क यांनी 19 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजून 50 मिनिटांनी हे ट्विट केले आहे. तेव्हा पासूनच सोशल मिडियावर हे ट्विट प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे.
Join Our WhatsApp Community