ट्विटरचे सूत्र हाती घेतल्यानंतर एलॉन मस्क यांनी मोठ्याप्रमाणात कर्मचारी कपात केली, मात्र आता त्यांना या निर्णयाचा पश्चाताप होत आहे. ट्विटरचे नवे बॉस मस्क यांना त्यांची चूक कळली असून त्यांच्या एका ट्विटमध्ये त्यांनी ट्विटरवर मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली, ही त्यांची सर्वात मोठी चूक असल्याचे मान्य केले. विशेष म्हणजे कंपनीची मुख्य जबाबदारी सांभाळण्याबरोबरच येथे कार्यरत असलेल्या जवळपास निम्म्या कर्मचाऱ्यांना त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता. या घेतलेल्या निर्णयाचाच त्यांना आता पश्चाताप होत आहे.
(हेही वाचा – Sharddha Murder Case: ‘जाणारा प्रत्येक दिवस…’, श्रद्धाची ‘ती’ पोस्ट ठरली शेवटची)
मस्क यांनी ट्विट करून म्हटले…
एलॉन मस्क यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला, मस्क यांना ही आपली चूक वाटत असून ही चूक लक्षात आल्यावर एलॉन मस्क यांनी एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी असे म्हटले की, ‘जेव्हा मी चूक आहे हे कबूल करणे खूप महत्त्वाचे आहे आणि कर्मचाऱ्यांना काढून टाकणे ही खरोखरच माझी सर्वात मोठी चूक होती.’
दरम्यान, आपली चूक मान्य करत मस्क यांनी आणखी एका ट्विटमध्ये ट्विटर कंपनीत परत बोलावलेल्या दोन कर्मचाऱ्यांसह एक फोटोही शेअर केला आहे. कर्मचारी कपातीनंतर एलॉन मस्क यांनी अनेक कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याची विनंती केली होती. मस्क यांनी मंगळवारी असे म्हटले की, राहुल लिग्मा आणि डॅनियल जॉन्सन यांना काढून टाकण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे मी त्यांनी ट्विटरमध्ये परत आणत आहे.
Join Our WhatsApp CommunityImportant to admit when I’m wrong & firing them was truly one of my biggest mistakes
— Elon Musk (@elonmusk) November 15, 2022