Twitter युजर्ससाठी आनंदाची बातमी! ब्लू टिक सब्सक्रिप्शनचा निर्णय लांबणीवर; वेगळ्या रंगाची टिक मिळणार?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरच्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरवर ब्लू टिकसाठी दरमहा $8 आकारण्याची योजना सध्या पुढे ढकलली आहे. ब्लू टिक सब्सस्क्रिप्शनचा 28 नोव्हेंबरपर्यंत सुरू होईल अशी घोषणा मस्क यांनी केली होती. मात्र आता हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. यासह मस्क यांनी ट्विटरवर ब्लू टिक सबस्क्रिप्शनबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मस्क यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

ट्विटरचा ताबा घेताच मस्क यांनी दरमहा 8 डॉलर पैसे देऊन ब्ल्यू टिक देण्यास सुरुवात केली होती, मात्र बनावट ब्ल्यू टिक अकाऊंटची वाढती संख्या पाहता मस्क यांनी या सुविधेवर बंदी घातली होती. आता मस्क यांनी ही योजना पुढे ढकलली आहे. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीची योग्य चौकशी होत नाही तोपर्यंत त्याला ट्विटरची ब्लू टिक दिली जाणार नाही, असे मस्क यांनी सांगितले.

(हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट? दाऊदच्या हस्तकांकडून मुंबई पोलिसांच्या हेल्पनाईनवर धमकी)

दरम्यान, बनावट अकाऊंटला पूर्णपणे आळा घालण्यासाठी योग्य मार्ग मिळेपर्यंत ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा लाँच करणं थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मस्कच्या निर्णयानुसार युजर्सना ब्लू टिक पेड सबस्क्रिप्शनसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मस्क यांनी सांगितले की, जोपर्यंत या ट्विटरवर फेक अकाऊंट बंद करता येतील याची खात्री होत नाही तोपर्यंत ते ब्लू टिक व्हेरिफिकेशनचे री-लॉंचिंग थांबवण्यात येत आहेत. तसेच व्यक्ती आणि संस्थांसाठी वेगळ्या रंगाची टिक वापरण्याचा विचारही सुरू आहे. याद्वारे व्यक्ती आणि संस्थेच्या ट्विटमधील फरक ओळखता येणं शक्य होईल. त्यामुळे लवकरच येत्या काळात याबाबत अधिक माहिती समोर येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here