इलॉन मस्कच्या एंट्रीनंतर ट्विटरमध्ये अनेक मोठे बदल होत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मस्क यांनी लोकांना कंपनीतून काढून टाकले होते. तर काहींना कंपनीत परतही बोलावले जात आहे. इतकेच नाही तर ट्विटरवर आता नवे फिचर्स जोडण्याची तयारी मस्क यांच्याकडून सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – पुण्यातील ‘या’ 11 मार्गांवर PMPMLची सेवा होणार बंद!)
दरम्यान, ट्विटर एका नवीन फीचरवर काम करत आहे. आता या फीचरवर तुम्हाला व्हॉट्सअॅप आणि सिग्नल सारखी सुविधा मिळणार आहे. यासाठी कंपनी एंड-टू-एंड एन्क्रिप्शनच्या फीचर्सची चाचणी करत आहे. सध्या या फीचरची अँड्रॉईड यूजर्ससाठी चाचणी सुरू आहे, अशी माहिती अॅपचे संशोधक जेन मंचुन वोंग यांनी ट्विट करून दिली आहे. अॅपचे संशोधक जेन मंचुन वोंग यांनी असे सांगितले की, ट्विटर एंड-टू-एंड एनक्रिप्टेड डीएम म्हणजे डायरेक्ट मेसेजचे फीचर परत आणत आहे. याबाबत मस्कने केलेल्या पोस्टसोबत कोड स्ट्रिंगचा फोटो देखील जोडला आहे, ज्यामध्ये एनक्रिप्शन की हायलाइट केली आहे.
Twitter is bringing back end-to-end encrypted DMs
Seeing signs of the feature being worked on in Twitter for Android: https://t.co/YtOPHH3ntD pic.twitter.com/5VODYt3ChK
— Jane Manchun Wong (@wongmjane) November 16, 2022
एलॉन मस्क यांनीही जेन मंचुन वोंग यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. त्याने एका इमोजीसह उत्तर दिले आहे, जे सूचित करते की, कंपनी या फिचरवर काम करत आहे. याशिवाय कंपनी इतर अनेक नवीन फीचर्सवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community