मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर विकत घेतलेल्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी गुरूवारी एक ट्विट केले असून त्यांनी त्यात सूचित केले की, ते ट्विटरनंतर आता कोका-कोला विकत घेण्याचा विचार करत आहे जेणेकरून तो त्यात कोकेन घालू शकेल. टेस्लाचे संस्थापक मस्क हे ट्विटरवर विनोद करण्यासाठी देखील ओळखले जातात.
असे केले एलॉन मस्क यांनी ट्वीट
एलॉन मस्क यांनी आज ट्वीट करत म्हटले की, मी कोका-कोला कंपनी खरेदी करणार आहे. कोका-कोलामध्ये पुन्हा एकदा कोकेनचा वापर करता यावा, यासाठी कंपनी खरेदी करणार असल्याचे एलॉन मस्क यांनी सांगितले. एलॉन मस्क यांच्या ट्वीटवर युजर्सकडून अनेक प्रतिक्रिया येत आहे.
Next I’m buying Coca-Cola to put the cocaine back in
— Elon Musk (@elonmusk) April 28, 2022
लवकरच मस्क कोको-कोलाचे मालक होणार
मिळालेल्या माहितीनुसार, Esha Griggs Candler यांनी १८९२ मध्ये The Coca-Cola कंपनीची स्थापना केली. आता ही एक मोठी कंपनी म्हणून विकसित झाली आहे. या कंपनीचे सध्याचे सीईओ जेम्स क्विन्सी आहेत. तसेच कंपनीचे मुख्यालय यूएसमधील जॉर्जिया येथे आहे. आता एलॉन मस्क यांनी ही कंपनी विकत घेण्याची घोषणा केली आहे. सध्या एलॉन मस्क हे ट्विटरवर अॅक्टिव्ह असून ट्विटरच्या माध्यमातून आपल्या फॉलोअर्ससोबत संवाद साधत आहेत. त्यांनी यापूर्वी ट्विटर खरेदी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर मस्क यांनी तब्बल ४४ बिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास ३३६८ अब्ज रूपयांना ट्विटर विकत घेतले. त्यानंतर मस्क यांनी आपण कोको-कोला खरेदी करणार असल्याचे जाहीर केल्याने लवकरच मस्क कोको-कोला कंपनीचे मालक बनण्याचे शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community