प्रसिद्ध उद्योगपती टेस्लाचे सीईओ यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच ट्विटर हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतला. त्यानंतर ट्विटरचे नवे मालक होताच एलन मस्क यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ट्विटरवरील कायमस्वरूपी बंदी मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. काही वर्षांपूर्वी ट्विटरने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही विधानांमुळे त्यांच्यावर बंदी घातली होती. ही बंदी उठवणार असल्याचा मोठा निर्णय त्यांनी मंगळवारी घेतला.
ट्रम्प यांच्यावरील ट्विटर बंदी हटविणार
(हेही वाचा – औरंगाबादमध्ये धडक कारवाई; ३३८ घरं जमीनदोस्त, स्थानिकांना अश्रू अनावर)
एलन मस्क यांच्या या घोषणेमुळे ट्रम्प लवकरच मायक्रोब्लॉगिंग वेबसाइटवर परतणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासह असेही सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ट्विटरवर बंदी घालण्याचा निर्णय हा नैतिकदृष्ट्या चांगला निर्णय नव्हता. टेस्लाचे मुख्य कार्यकारी एलन मस्क यांनी मंगळवारी ‘फायनान्शियल टाइम्स फ्यूचर ऑफ द कार कॉन्फरन्स’मध्ये बोलताना सांगितले की, ते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर खात्यावरील बंदी संपुष्टात आणणार आहे. दरम्यान एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यावर नाही तर ही शक्यता फार पूर्वीपासून व्यक्त केली जात होती.
…म्हणून केले होते ट्रम्प यांची अकाऊंट ब्लॉक
असे सांगितले जात आहे की, अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये सत्तांतर झाल्यानंतर लोकांनी हिंसाचार सुरु केल्याने ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमची बंदी घातली होती. 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल कॉम्प्लेक्स येथे झालेल्या हिंसाचारानंतर फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबने ट्रम्प यांची अकाऊंट ब्लॉक केली होती. अध्यक्षीय निवडणुकीत जो बायडेन यांचा विजय झाला होता. यामुळे ट्रम्प आपल्या समर्थकांना हिंसाचारासाठी आणखी चिथावणी देऊ शकतात, असे या कंपन्यांनी म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या अकाऊंटवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता.