ब्लू टिकधारक धोक्यात; ट्वीटर अकाऊंटची पडताळणी होणार, मस्क यांचे ट्वीट चर्चेत

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ट्वीटरचे मालक एलाॅन मस्क हे ब्लू टिक ट्विटर अकाऊंटची पडताळणी करणार असून अपात्र ठरणा-या अकाऊंटची ब्लू टिक हटवण्यात येणार आहे. एलाॅन मस्क यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. मस्क यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ट्वीटरने याआधी दिलेल्या ब्लू टिकची पडताळणी होणार असून, पात्र न ठरणा-या अकाऊंटची ब्लू टिक हटवण्यात येईल.

ब्लू टिक अकाऊंट्सची पडताळणी होणार

एलाॅन मस्क यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, ट्विटरच्या आधीच्या ब्लू टिक प्रक्रियेमध्ये अने क्षुटी आढळल्या आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये ब्लू टिकची पडताळणी होणार असून, पात्र नसणा-यांची ब्लू टिक हटवण्यात येईल.

( हेही वाचा: मांजर पाळण्यासाठी आता घ्यावी लागणार पालिकेची परवानगी )

पॅरोडी अकाऊंट्सवर मस्क यांचा निशाणा

सध्या ट्वीटरच्या पॅरोडी अकाऊंट्सवर कारवाई सुरु आहे. मस्क यांनी म्हटले आहे की, पॅरोडी अकाऊंट्स हे लोकांना फसवण्याचे काम करत आहेत. सध्या ट्वीटरकडून बनावट अकाऊंट्सवर कारवाई सुरु आहे. मस्क यांनी म्हटले की, पॅरोडी अकाऊंट्स हे लोकांना फसवण्याचे काम करत आहेत. सध्या ट्वीटरकडून बनावट अकाऊंट्सवर कारवाई सुरु आहे. अनेक बनावट अकाऊंट्स हटवण्यात आले आहेत.

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here