एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या ब्लू टिक सबस्क्रिप्शनबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ट्विटर आपल्या ताब्यात घेतल्यापासून एलॉन मस्क ट्वीटरमध्ये सतत बदल करत आहेत. कंपनीने अलीकडेच ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन सेवा बंद केली होती. परंतु आता कंपनीने नुकतीच ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन सेवा जारी केली आहे. ट्विटरचे ब्लू टिक सबस्क्रिप्शन पुन्हा लागू केले जाणार आहे. ट्विटरवर अनेक बनावट अकाऊंटने ब्लू टिक्स मिळवल्याच्या घटनांनंतर ही सेवा बंद करण्यात आली होती. ती आता पुन्हा सुरू करण्यात येत आहे.

ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी सांगितले की, बंद करण्यात आलेली ट्विटर ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा २९ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होत आहे. मस्क यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

( हेही वाचा: आता PMPML बसने प्रवास करण्यासाठी पोलिसांनाही काढावे लागणार तिकीट )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here