ट्वीटरवर आता ब्लू टिक फूकट मिळणार नाही; प्रति महिना मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

148

एलाॅन मस्कने ट्वीटर विकत घेतले आणि त्यामध्ये काही मोठे बदल केले आहेत. ट्वीटरचे संचालक पराग अग्रवाल यांच्यासह अनेक अधिका-यांच्या हकालपट्टीनंतर आता आणखी एक मोठा निर्णय एलाॅन मस्क याने घेतला आहे. ट्वीटरच्या या नवीन मालकाने ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यापुढे जर आता तुम्हाला ट्वीटर अकाउंटपुढे ब्लू टिक हवे असेल तर प्रति महिना पैसे मोजावे लागणार आहेत.

( हेही वाचा: राणीबागेतील यापूर्वीचा गर्दीचा विक्रम मोडीत: रविवारी एकाच दिवशी सुमारे ३१ हजार पर्यटकांची हजेरी )

आता व्हेरिफिकेशनसाठी प्रतिमहिना शुल्क आकारले जाणार

ट्वीटरची ब्लू टिक म्हणजे अर्थात तुमचे अकाऊंट व्हेरिफाय होणे. आतापर्यंत ट्वीटरचे व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया अगदी मोफत होती. त्यासाठी कोणतेही शुल्क मोजावे लागत नव्हते. पण आता मात्र ट्वीटरची सूत्रे एलाॅन मस्क यांच्या हातात गेल्यानंतर या व्हेरिफिकेशनसाठी प्रतिमहिना शुल्क आकारले जाणार आहे. ब्लू टिक वापरण्यासाठी आता प्रति महिना 4.99 डाॅलर्स म्हणजेच सुमारे 415 रुपये प्रति महिना भरावे लागण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.