हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्राइलने युद्धाची घोषणा केली आहे. यानंतर इस्राइल आणि हमास या दोन्ही देशांमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये आता इलॉन मस्कची कंपनी एक्स देखील मोठी भूमिका बजावत आहे. या युद्धाबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्या कित्येक ‘एक्स’ (ट्विटर) अकाउंट्सना बंद करण्यात येत आहे.युरोपियन युनियन सोबतच जगभरातील इतर देशांच्या कायद्यांचे पालन आम्ही करत आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं. (Israel-Palestine Conflict)
एक्सच्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी गुरुवारी ( १२ ऑक्टोबर) याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं, की इस्राइलवरील हल्ल्यानंतर कंपनीने शेकडो हमास-संबंधित एक्स अकाउंट्स बंद केले आहेत. यासोबतच चुकीची माहिती पसरवणाऱ्या कित्येक पोस्ट्स हटवण्यात आल्या आहेत. (Israel-Palestine Conflict)
युरोपियन संघाचा इशारा
इस्राइलवर झालेल्या हल्ल्यानंतर ट्विटरवर मोठ्या प्रमाणात डिस्टर्बिंग फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये हत्येचे रेकॉर्डिंग, जखमी व्यक्ती, निर्वस्त्र महिला वा मृतदेह अशा प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळेच युरोपियन युनियनने याबाबत तातडीने कारवाई करण्याचा इशारा इलॉन मस्कला दिला होता.
(हेही वाचा : TDS Return : टीडीएस रिटर्नसाठी १ ऑक्टोबर पासुन नवीन नियम)
डिजिटल सर्व्हिसेस कायद्याअंतर्गत नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांचे पालन न करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या कंपनीला आपल्या कमाईचा ६ टक्के भाग EU ला द्यावा लागणार आहे. सोबतच युरोपातील देशांमध्ये ही साईट बॅन देखील होऊ शकते.
Join Our WhatsApp Community