लोकप्रिय युट्युबर आणि बिग बॉस फेम एल्विश यादव (Elvish Yadav) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हे प्रकरण रेव्ह पार्टीमध्ये विषारी सापाच्या विषाच्या (Poisonous Snakes) बेकायदेशीर पुरवठ्याशी संबंधित आहे. या सापांचे विष रेव्ह पार्यांमध्ये मादक पदार्थांसाठी वापरले जाते. या मुद्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या प्रकरणी नोएडा पोलिसांनी (Elvish Yadav) वनविभागासह 2 नोव्हेंबर रोजी छापा टाकला होता, या छाप्यात 9 सापांपैकी 5 नाग होते, जे अत्यंत विषारी आहेत. या छाप्यावेळी एक घोडा आणि बिबट्यादेखील जप्त करण्यात आला आहे. याशिवाय आरोपींकडून सापाचे 20 मिली विषही सापडले. आरोपींची चौकशी केली असता, दिल्ली-एन. सी. आर. मधील रेव पार्टीमध्ये सापाचे विष मादक पदार्थांसाठी (Drugs) वापरले जात असल्याची माहिती उघड झाली.
आता एल्विश यादवनं (Elvish Yadav) माझ्यावर केले गेलेले सर्व आरोप खोटे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच एल्विशनं नुकताच एक व्हिडीओ शेअर करून मनेका गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे त्यात म्हंटले आहे.
(हेही वाचा – Ratan Dubey : खळबळजनक! भर सभेत नक्षलवाद्यांनी केली भाजप नेत्याची निघृण हत्या)
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार मेनका गांधी यांनी रेव्ह पार्टी बस्ट प्रकरणात एल्विश यादवला अटक करण्याची मागणी करणारे निवेदन जारी केले होते.त्यांनी खुलासा केला की, त्यांच्या एनजीओने काही काळ एल्विश यादववर (Elvish Yadav) नजर ठेवली होती कारण तो त्याच्या व्हिडीओंमध्ये विषारी सापांचा वापर करत होता. आता एल्विश यादवनं हे सर्व आरोप खोटे असल्याचं सांगून मनेका गांधी यांच्यावर टीका केली.
एल्विशनं (Elvish Yadav) एक ट्वीट देखील शेअर केलं होतं. या ट्वीटमघध्ये त्यानं लिहिलं होतं, “इस्कॉन पे इल्ज़ाम लगा दो,मुझ पे लगा दो,ऐसे मिलती है टिकट लोकसभा की?” या ट्वीटमध्ये त्यानं shame on maneka gandhi हा हॅशटॅग देखील वापरला आहे.
Iskon Pe Ilzaam Laga do
Mujh Pe Laga do
Aise Milti Hai ticket Lok Sabha ki? #shameonmanekagandhi— Elvish Yadav (@ElvishYadav) November 3, 2023
त्यामुळे या मुद्द्यावरून पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता वाढली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community