मुंबईच्या सौंदर्यीकरणात पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील रंगरंगोटीवर भर

168

मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग हे काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर या रस्त्यांवर पहिल्या टप्प्यात रंगरंगोटी करण्यात येणार आहे. या रस्त्यांवरील खड्डयांच्या मुद्द्यावरून सरकारने हे दोन्ही रस्ते महापालिकेच्या ताब्यात देण्यास एमएमआरडीएला भाग पाडल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून या दोन्ही द्रुतगती महामार्गावर पांढरे पट्टे मारले जाणार आहेत. मुंबईतील सुशोभिकरणांतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये आता दोन्ही द्रुतगती महामार्गांचा समावेश करण्यात आला आहे.

१,७२९ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली

महापालिकेच्यावतीने मुंबईचे सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीकोनातून सुमारे १,७२९ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली असून पहिल्या टप्प्यातील कामे डिसेंबर २०२२पर्यंत पूर्ण करण्याचे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आश्वासनानुसार महापालिका आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. महापालिका आयुक्त तसेच प्रशासक इक्बालसिंह चहल यांच्या निर्देशानुसार मुंबईचे सौंदर्यीकरण करण्याच्या ज्या कामांची किंमत ५० लाखांपेक्षा जास्त आहे अशा कामांना स्थायी समिती प्रशासकांची कार्योत्तर मंजुरी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

(हेही वाचा दिवाळीत फटाके फोडताना मुंबईकरांनो घ्या अशी काळजी)

प्रत्येक विभागाला ५ कोटी रुपये खर्च करण्याची मुभा

तसेच वाहतूक सुविधा पुरवणे, निश्चित करणे आणि सुधारणा करणे आदी कामांसाठी प्रत्येक विभागाला प्रत्येकी ५ कोटी रुपये खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामध्ये रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंग, लेन मार्किंगची कामे जलद गतीने करण्याच्या सूचना करून काही दिवसांपूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्या पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील लेन मार्किंगची कामेही विभाग स्तरावर करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. मुंबईतील सौंदर्यीकरण करण्याच्या कामांच्या सर्व निविदा या २० ऑक्टोबर पूर्वी काढण्याच्या सूचना केल्यानंतर त्यानुसार विभागाने निविदाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तर स्ट्री फर्निचरच्या निविदाही मध्यवर्ती खरेदी खात्यांमार्फत मागवण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.