पर्जन्य जलवाहिन्यांचे सक्षमीकरण आवश्यक; माजी आयुक्त जयराज फाटक यांचे मत

112

बदलत्या पर्यावरणामुळे एकाच दिवसात पडणारा अनेक दिवसांचा पाऊस हे एक मोठे आव्हान आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांचे सक्षमीकरण करण्यासह पर्जन्य जलवाहिन्यांचे नियमित व योग्यप्रकारे परीक्षण करणे, गरजेचे आहे. त्याचबरोबर या अनुषंगाने विविध उपाययोजना सातत्याने अधिकाधिक प्रभावीपणे राबविणे गरजेचे असल्याचे माजी महापालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक यांनी स्पष्ट केले.

( हेही वाचा : आता आकाशातून पहा विलोभनीय कोकण )

पर्जन्य जलवाहिन्यांचे सक्षमीकरण आवश्यक

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आणि ‘वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया’ या संस्थेच्या सहकार्याने ‘मलबार हिल’ परिसरातील ‘सह्याद्री राज्य अतिथीगृह’ येथे आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते. या कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमाला मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू आणि मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान आजच्या समारोपीय कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक करताना अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी या कार्यशाळेमध्ये गेल्या दोन दिवसातील चर्चांचा संक्षिप्त आढावा घेतला. तसेच या कार्यशाळेमध्ये दृकश्राव्य प्रणालीद्वारे जगभरातील अनेक तज्ञ मंडळींनी सहभाग नोंदविल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. समारोपीय कार्यक्रमाच्या शेवटी ‘वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’ संस्थेच्या प्रतिनिधी लुबायना रंगवाला यांनी आभार प्रदर्शन केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.