लता मंगेशकर (Lata Mangeshkar) या भारतातल्या सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय गायिकांपैकी एक होत्या. त्यांची कारकीर्द सहा दशकांची होती. म्हणजे साठ वर्षं त्यांनी आपली कारकीर्द यशस्वीपणे गाजवली होती. लतादीदींनी तीसपेक्षा जास्त भाषांमध्ये चित्रपटांसाठी आणि इतर गाणी गायली आहेत. त्या भारतीय चित्रपटसृष्टीतल्या एक महान पार्श्वगायिका म्हणून प्रसिद्ध आहेत. लतादिदींच्या जादुई आवाजाने फक्त भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. टाइम्स मासिकाने त्यांना भारतीय पार्श्वगायनाची अपरिहार्य आणि परिपूर्ण सम्राज्ञी म्हणून उपाधी दिली आहे. त्यांच्या सुमधुर आवाजचे जगभरात चाहते आहेत. सर्वजण त्यांना प्रेमाने ‘लतादीदी’ असं म्हणतात. २००१ साली भारत सरकारने त्यांना भारताचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित केलं होतं.
मध्य प्रदेशातल्या इंदूर या शहरामध्ये पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात २८ सप्टेंबर १९२९ साली लतादिदींचा जन्म झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे एलजीचे थिएटर आर्टिस्ट आणि गायक होते. लतादीदींच्या कुटुंबातून त्यांची भावंडे भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि बहिणी उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि आशा भोसले या तिघांनीही संगीतक्षेत्रात काम करण्याची निवड केली होती. लतादीदी भावंडांमध्ये सर्वांत मोठ्या होत्या. लतादीदींचा जन्म इंदूरमध्ये झाला असला तरी त्या महाराष्ट्रातच लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत. लहानपणापासूनच त्यांची गायिका होण्याची इच्छा होती.
(हेही वाचा – Threatening Phone Call : भाजपाच्या ‘या’ नेत्यांना पाकिस्तानातून आला धमकीचा कॉल)
वसंत जोगळेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात लतादीदींनी पहिल्यांदा कीर्ती हसलसाठी गाणं गायलं होतं. पंडित दीनानाथ मंगेशकरांना लतादीदींनी (Lata Mangeshkar) चित्रपटांसाठी गाणं गायलेलं आवडलं नाही. म्हणून त्यांनी हे गाणं चित्रपटातून काढून टाकलं. पण वसंत जोगळेकर मात्र लतादीदींच्या प्रतिभेने खूप प्रभावित झाले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर लतादीदींना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. त्यावेळी त्या फक्त तेरा वर्षांच्या होत्या.
त्यांना अभिनयाची फारशी आवड नव्हती पण वडिलांच्या अकाली निधनामुळे त्यांना पैसे कमावण्यासाठी काही हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करावं लागले. अभिनेत्री म्हणून त्यांचा पहिला चित्रपट मंगळागौर हा १९४२ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी स्नेहप्रभा प्रधान यांच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारली होती. नंतर त्यांनी माझे बाळ, चिमुकला संसार (१९४३), गजभाऊ (१९४४), बडी माँ (१९४५), जीवन यात्रा (१९४६), मान (१९४८), छत्रपती शिवाजी (१९५२) या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. बडी माँ या चित्रपटामध्ये, लतादीदींनी (Lata Mangeshkar) नूरजहाँच्या विरुद्ध भूमिका साकारली होती. त्याच चित्रपटात आशा भोसले यांनी त्यांच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारली होती.
(हेही वाचा – Muda Scam प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांवर एफआयआर दाखल)
त्या चित्रपटात लतादीदींनी (Lata Mangeshkar) स्वत:च्या भूमिकेसाठी आणि आशाजींच्या भूमिकेसाठी पार्श्वगायनही केलं होतं. १९४७ साली वसंत जोगळेकर यांनी लतादीदींना त्यांच्या ‘आपकी सेवा में’ या चित्रपटात गाण्याची संधी दिली. या चित्रपटातल्या गाण्यांमुळे लतादीदी खूप लोकप्रिय झाल्या. त्यानंतर लतादीदींनी मजबूर चित्रपटातलं “अंग्रेजी छोरा चला गया” आणि “दिल मेरा तोडा है मुझे कहीं का ना छोडा तेरे प्यार ने” यांसारख्या गाण्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं स्थान मजबूत केलं. पण असं असूनही लतादीदी एका स्पेशल हिटच्या शोधात होत्या.
१९४९ साली ‘महल’ चित्रपटातल्या ‘आयेगा आनेवाला’ या गाण्यामुळे लतादीदींना तशी संधी मिळाली. हे गाणं त्या काळातल्या सर्वात सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री मधुबालावर चित्रित करण्यात आलं होतं. हा चित्रपट अत्यंत यशस्वी ठरला. तसंच लतादीदी आणि मधुबाला या दोघींसाठीही शुभशकुनी ठरला. त्यानंतर लतादीदींनी (Lata Mangeshkar) आपल्या कारकिर्दीत कधीच मागे वळून पाहिलं नाही. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजण्याआधी काही काळ त्या आजारी होत्या. ६ फेब्रुवारी २०२२ साली मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये कोविड-संबंधित गुंतागुंतांमुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community