एन्काऊंटर स्पेशालिस्ट शर्मा यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी!

वाझे आणि शर्मा यांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

129

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना एनआयएने सलग दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी बोलावले आहे. शर्मा हे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एनआयए कार्यालयात दाखल झाले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. वाझे याने चौकशीत प्रदीप शर्मा यांचे नाव घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच जिलेटीन कांड्या शर्मा यांनी मागवल्याचे वाझे याने आपल्या जबाबात म्हटले असल्याचे एनआयएच्या सूत्रांचे म्हणणे आहे. वाझे आणि शर्मा यांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सलग दुस-या दिवशी चौकशी

अ‍ॅंटिलिया जवळ स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी बुधवारी एनआयएने तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची चार तास, तर एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांची साडे आठ तास चौकशी केली. दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रदीप शर्मा यांना एनआयएने चौकशीसाठी बोलावून घेतले आहे. गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास प्रदीप शर्मा हे चौकशीसाठी एनआयएच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.

(हेही वाचाः मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी प्रदीप शर्मांची चौकशी! एनआयएच्या कार्यालयात दाखल!)

काय आहे शर्मा यांचे कनेकक्शन?

सचिन वाझे यांनी प्रदीप शर्मा यांचे नाव घेऊन जिलेटीन कांड्या शर्मा यांनीच आणून दिल्या होत्या, असे सूत्रांकडून समजते. तसेच १४ मोबाईल सिम कार्ड पैकी एक सिम प्रदीप शर्मा हे स्वतः वापरत असल्याचा संशय एनआयएला आहे. त्याबाबत काही पुरावे एनआयएच्या हाती लागलेले आहेत. ३ मार्च रोजी वाझे विनायक शिंदे, शर्मा यांना अंधेरी येथे भेटले होते, अशीही माहिती एनआयएच्या हाती लागली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.