खऱ्या गड-किल्ल्यांवर अतिक्रमण अन् मंत्र्याच्या बंगल्यांना गड-किल्ल्यांच्या नावांचा देखावा!

शिवकालीन पराक्रमाचे जीवंत साक्षीदार असलेल्या राज्यातील गड-किल्ले यांच्यावर सध्या अतिक्रमण केले जात आहे. काही ठिकाणी मुस्लिम धर्मीयांचे धार्मिक स्थळं बेकायदेशीररित्या उभारले जात असल्याचेही धक्कादायक वास्तव समोर आले आहे. काही गड-किल्ल्यांची अवस्था पडझड झालेल्या रूपात आहे. तर काही गड-किल्ले नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. काही महिन्यांपूर्वी ठाकरे सरकारने राज्यातील गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात ती घोषणा केवळ कागदोपत्रीच राहिली आहे की काय? असा प्रश्न उपस्थित झाल्या वाचून राहत नाही. असे चित्र निर्माण झाले असताना दूसरीकडे ठाकरे सरकार मंत्र्याच्या बंगल्यांना गड-किल्यांची नावं देऊन दूर्गप्रेमींच्या भावना दुखावत आहे, अशी चर्चा देखील सुरू आहे.

किल्ल्यांवरच बांधलं थडगं!

राज्यातील गड – किल्ल्यांचे संवर्धन केले जाईल, अशी घोषणा करणारे ठाकरे सरकार प्रत्यक्ष मात्र उर्दू भवन उभारण्यात मग्न आहे. दुसरीकडे शिवकालीन गड–किल्ले यावर मात्र मुसलमान अतिक्रमण करत आहेत, काही ठिकाणी तर हिंदूंना येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, तरीही ठाकरे सरकार गप्प असून पुरातत्व विभागही निष्क्रिय आहे. नुकतेच रायगडावर मदार उभारण्याचा डाव शिवप्रेमींनी हाणून पाडला, त्यापाठोपाठ पुण्यातील लोहगडावर उरूस साजरा केला जाणार असल्याचे उघडकीस आणले. त्यानंतर मुंबईतील कुलाबा किल्ल्यावर थेट थडगं बांधण्यात आल्याचा भंयकर प्रकार उघड झाला आहे. हा असाच प्रकार सुरू राहिला तर उद्या राज्यातील सर्व गड–किल्ल्यांवर श्रीमलंग गडाप्रमाणे हिंदूंना अतिक्रमित मुसलमानांकडून प्रतिबंध केला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

संवर्धन तर नाहीच केवळ नावांचा देखावा

दरम्यान, अशाप्रकारे राज्यातील ऐतिहासिक वारसा असणाऱ्या गड-किल्ल्यांचं पावित्र्य नष्ट केलं जात असून गड-किल्ल्यांची भीषण दुरावस्था होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. यासंदर्भात ठाकरे सराकर कोणतीही गंभीर पाऊलं न उचलता त्याचा पाठपुरावा किंवा संवर्धनदेखील करताना दिसत नाही. तर राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यांना मात्र गड-किल्यांची नाव देऊन केवळ देखावा करतांना दिसत आहे. यावरून दुर्गाप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण असून मंत्र्याच्या बंगल्यांना गड-किल्ल्यांची नावं देऊन नेमकं काय सूचवायचे आहे, असा सवाल दुर्गाप्रेमींकडून विचारला जात आहे.

नावं देऊन काय होणार कृती करा

 

राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्यकारभार करण्याचा प्रयत्न केला जातोय. महाराजांचं नाव घेऊन जनतेची दिशाभूल आणि फसवणूक केली जातेय. एकीकडे महाराजांच्या गड-किल्ल्यांवर धार्मिक अतिक्रमण केलं जात असताना ठाकरे सरकार राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यांना गड किल्ल्यांची नावं देतंय. बंगल्याला नावं देण्याला विरोध नाही, तर मात्र तुम्ही खरे शिवभक्त असाल, मावळे असाल ते तुमच्या कृतीतून दाखवा. बऱ्याच किल्ल्यांची दयनीय अवस्था आहे, पडझड होतेय. असेही काही किल्ले आहेत जिथे पोहोचण्यासाठी नीट वाट देखील नाही, सर्व किल्ल्यांवर महाराजांचा शूर इतिहास सांगण्यास कोणत्याही गाईडची व्यवस्था नाही. यासर्व बाबी लक्षात घेऊन ठाकरे सरकारनं पहिलं प्राधान्यानं हे काम करणं अपेक्षित आहे. नुसतं एखाद्या मंत्र्याच्या बंगल्याला रायगडाचं नावं देऊन काय होणार? स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडची वास्तविक परिस्थिती काय आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे. नावं देऊन काय होणार कृती करा

 

– सुनील पवार, अध्यक्ष, किल्ले रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती

ठाकरे सरकारला पडला केलेल्या घोषणेचा विसर

राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासंदर्भात आता पावले टाकण्यात येत असून राज्यातील दुर्गप्रेमी, दुर्गसंवर्धक आणि गिर्यारोहक यांनी यासंदर्भातील आपल्या सूचना व प्रस्ताव मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षास त्वरित पाठवाव्यात असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जून २०२१ मध्ये केले होते. यावेळी राज्यातील गड – किल्ल्यांचे संवर्धन केले जाईल, अशी घोषणा ठाकरे सरकारने केली होती. मात्र या घोषणेचा ठाकरे सरकारला विसर पडल्याचे प्रकर्षाणे जाणवतेय.

राज्याच्या सार्वजनिक आणि बांधकाम विभागाने काढलेल्या एका परिपत्रकानुसार आता मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांच्या नावांना गडकिल्ल्यांची नावे देण्यात आली आहे. ठाकरे सरकारच्या २० कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या बंगल्यांना आता गडकिल्ल्यांचे नाव देणारा आदेश जारी करण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाला गड किल्ल्यांची नावे देण्याची मागणी केली होती. ही मागणी राज्य सरकारपुढे विचाराधीन होती. त्यानुसार सार्वजनिक आणि बांधकाम विभागाला मंत्र्यांच्या आणि राज्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना गड किल्ल्यांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबतचे पत्रकही जारी करण्यात आले आहे.

(हेही वाचा – रायगड, लोहगड आता कुलाबा किल्ला! बांधले थडगे, अंथरली हिरवी चादर…)

गड-किल्ल्यांच्या नावाने ओळखणार मंत्र्यांचे बंगले

 • अ ३ – शिवगड, जितेंद्र आव्हाड
 • अ ४ – राजगड, दादा भुसे
 • अ ५ – प्रतापगड, केसी पाडवी
 • अ ६ – रायगड – आदित्य ठाकरे
 • बी १ – सिंहगड – विजय वड्डेटीवार
 • बी २ – रत्नसिंधू, – उदय सामंत
 • बी ३ – जंजिरा, अमित देशमुख
 • बी ४ – पावनगड – वर्ष गायकवाड
 • बी ५ – विजयदुर्ग – हसन मुश्रीफ
 • बी ६ – सिद्धगड – यशोमती ठाकूर
 • बी ७ – पन्हाळगड – सुनील केदार
 • क १ – सुवर्णगड, गुलाबराव पाटील
 • क २ – ब्रह्मगिरी, संदीपान भुमरे
 • क ५ – अजिंक्यतारा – अनिल परब
 • क ६ – प्रचितगड, बाळासाहेब पाटील

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here