अवैधरित्या धर्मांतरण करणा-या संघटनांवर ईडीची छापेमारी! विदेशी फंडिंग होत असल्याचा संशय

जबरदस्ती धर्मांतरण करण्याच्या बाबतीत या संघटना महत्त्वाची भूमिका बजावत होत्या, असे केंद्रीय तपास यंत्रणेच्या लक्षात आले आहे.

137

ईडीने ईस्लामी धर्मांतरणाशी संबंधित असलेल्या 6 वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली आहे. शनिवारी ईडीकडून दिल्ली आणि उत्तर प्रदेशात ठिकठिकाणी छापेमारी केली आहे. या कारवाईत अनेक संशयास्पद दस्ताऐवज ईडीच्या हाती लागले आहेत. यामुळे ईस्लामी धर्मांतरणासाठी सुरू असलेले छुपे प्रयत्न समोर आले आहेत. मौलाना मोहम्मद उमर गौतम अनेक ईस्लामी संघटनांसोबत मिळून हे धर्मांतरणाचे काम करत आहे.

सहा ठिकाणी ईडीची छापेमारी

या संघटनांना विदेशातून फंडिंग होत असल्याचे अनेक पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत. या पुराव्यांच्या आधारे अवैधरित्या धर्मांतरण करुन घेण्यासाठी या संघटनांना विदेशातून करोडो रुपये पुरवले जात असल्याचे ईडीच्या निदर्शनास आले आहे. दिल्लीत तीन आणि उत्तर प्रदेशात तीन अशा एकूण 6 ठिकाणी ईडीने आपली कारवाई केली आहे. यामध्ये दिल्लीच्या जामिया नगर येथील इस्लामिक दावा सेंटर(आयडीसी)च्या मुख्य कार्यालयावरही ईडीने छापा मारला आहे. ही संघटना धर्मांतरणासाठीचा मुख्य शामियाना समजला जातो.

(हेही वाचाः धर्मांतराचे दहशतवादी कनेक्शन : पाकिस्तानसह आखाती देशांपासून बीडपर्यंत पसरले जाळे!)

या संघटनांवर केली कारवाई

मौलाना मोहम्मद उमर गौतम आणि मुफ्ती काजी जहांगीर कासमी या कार्यालयातूनच धर्मांतरणाचे कार्य ऑपरेट करत होते. या दोघांनाही आता उत्तर प्रदेश पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. लखनऊच्या अल हसन एज्युकेशन अँड वेल्फेअर आणि गाइंडन्स एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या संत कबीर नगर येथील शाखेवर सुद्धा आपली छापेमारीची कारवाई केली आहे. या संघटनांशी उमर गौतम आणि जहांगीर कासमी यांचा संबंध होता. जबरदस्ती धर्मांतरण करण्याच्या बाबतीत या संघटना महत्त्वाची भूमिका बजावत होत्या, असे केंद्रीय तपास यंत्रणेच्या लक्षात आले आहे.

(हेही वाचाः ‘तो’ मौलवी निघाला अब्जाधीश! धर्मांतरासाठी शाळकरी हिंदू मुलांना नमाज पढायला सांगायचा! )

मनी लाँड्रिंगसाठी कारवाई

मनी लाँड्रिंगच्या तपासासाठी ईडीकडून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. एटीएसने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारेच ही कारवाई करण्यात येत आहे. या एफआयआर मध्ये पैशांचे आमिष दाखवून मागासवर्गीयांचे आणि अपंगांचे जबरदस्तीने धर्मांतरण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार असून, त्यात अजून काही धक्कादायक खुलासे समोर येणार असल्याचे म्हटले जात आहे.

32 जिल्ह्यांमध्ये एटीएसची कारवाई

उत्तर प्रदेशातील 32 जिल्ह्यांमध्ये धर्मांतरणाचे नेटवर्क शोधण्यासाठी एटीएसकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. हे नेटवर्क तपासण्यासाठी 100 पेक्षा जास्त अधिका-यांची फौज जुटली आहे. तपासासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली असून, त्यांच्याकडून आरोपींची चौकशी करण्याच येत आहे. या चौकशीत इरफान शेख, राहुल भोला आणि अब्दुल मन्ना ऊर्फ मन्नू यादव यांचीही लखनऊ जिल्हा तुरुंगात चौकशी करण्यात येत आहे.

(हेही वाचाः धर्मांतराला विरोध केला म्हणून धर्मांधांनी केला सामूहिक बलात्कार! )

300 पेक्षा अधिकांचे धर्मांतरण

दरम्यान या कारवाईनंतर मौलाना मोहम्मद उमर गौतम याने अलाहाबाद उच्च न्यायालयात ही चौकशी रोखण्यासाठी याचिका दाखल केली आहे. पण न्यायालयाने त्याची ही याचिका फेटाळली आहे. उमर आणि जहांगीर या दोघांनी सीएए-एनआरसीचा विरोध करताना 300 पेक्षा अधिकांचे अवैधरित्या धर्मांतरण केल्याची माहितीही समोर आली आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात हे दोघे आपल्या भाषणातून प्रचार करत असत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.