ED चा नवा पत्ता ऐकला का? अंडरवर्ल्ड दाऊदचा हस्तक ड्रग्ज तस्करच्या जागेत नवं कार्यालय

दिग्गज राजकीय नेत्यांपासून अनेक बॉलिवूड कलाकारांची गेल्या काही वर्षांत अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून (ED) चौकशी झाली आहे. यामुळे ईडीची चांगलीच चर्चा झाली. नुसती चर्चाच नाही तर मुंबईतील ‘ईडी’चे कार्यालयही चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते. परंतु याच ईडी कार्यालयाचा नवीन पत्ता होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लवकरच वरळीतील प्राईम लोकेशनला ‘ईडी’चे कार्यालय शिफ्ट होणार आहे.

असा असेल ED चा नवा पत्ता

ईडीचं नवं कार्यालय हे वरळीतील प्राईम लोकेशनवर म्हणजेच ही जागा एके काळी अंडरवर्ल्ड डॉन इकबाल मेमन उर्फ इकबाल मिरची याने विकत घेतली होती. मात्र जप्तीच्या कारवाईनंतर ईडीचे नवे कार्यालय या सीजे हाऊसमध्ये हलवण्यात येणार आहे. एकेकाळी ड्रग्ज तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या जागेत आता ईडीचे कार्यालय उभे राहणार आहे. तर ईडीचं सध्याचं झोनल ऑफिस मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसरातील कैसर ए हिंद इमारतीच्या तळ मजल्यावर आहे.

(हेही वाचा – ‘चूक झाली, मूर्खपणा झाला’: मोदींची ‘हत्या’ दाखवणाऱ्या YouTuber ने मागितली माफी, म्हणाला…)

जाणून घ्या सीजे हाऊसचा इतिहास

सीजे हाऊस हे वरळी विभागातील डॉ. अॅनी बेझंट रोडवर आहे. सीजे हाऊसच्या आधी हे ठिकाण वरळीचे प्रसिद्ध गुरुकृपा हॉटेल होते. हे हॉटेल सी साइड इन आणि ललित रेस्टॉरंट म्हणूनही ओळखले जात असे. हे हॉटेल एम. के. मोहम्मदच्या नावाने होती. त्यांचा शेजारील जमीन मालकाशी वाद सुरू होता. 1986 मध्ये इक्बाल मिरची याने ही मालमत्ता मोहम्मदकडून दोन लाख रूपयांना विकत घेऊन पहिली पत्नी हाजरा हिच्या नावावर केली होती. नंतर मिरचीने गॅरेज आणि मालमत्तेला लागून असलेली इमारत अतिक्रमण करून तेथे पब सुरू केला. मात्र, नंतर त्याला हा पब बंद करावा लागला. तेथून तो तो ड्रग्जचा काळा धंदाही करत होता. 1993 सालात मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात ही त्याचं नाव घेतलं जात होतं अशी माहिती मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here