नाशिकला “भारतातली वाईनची राजधानी” म्हटलं जातं. मात्र तुम्हाला माहितीय का, नाशिकमध्ये जवळपास ४१ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. यामध्ये ३३ खाजगी आणि २ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. नाशिकमध्ये सावरकरांसारख्या दिव्य विभुतींची पावले पडली आहेत. त्यामुळे नाशिकला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे.
नाशिकमधील अभियांत्रिकी महाविद्यालये भारतातील सर्वोच्च अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये स्थान मिळवू शकत नसली तरी, त्यापैकी अनेक महाविद्यालये उच्च दर्जाचे शिक्षण आणि चांगल्या सुविधा देतात. ही महाविद्यालये विद्यार्थ्यांना विविध प्रवेश परीक्षा जसे की MAH CET, JEE आणि GATE, त्यानंतर GD/PI फेऱ्यांद्वारे प्रवेश देतात. या महाविद्यालयांद्वारे ऑफर केलेले सरासरी प्लेसमेंट पॅकेज महिंद्रा, इन्फोसिस, बॉश आणि TAFE1 सारख्या कंपन्यांमध्ये रु. 4.5 लाख प्रति वर्ष ते रु. ७ लाख प्रति वर्ष पर्यंत असते.
नमूद केलेली महाविद्यालये नाशिकमध्ये अभियांत्रिकी शिक्षणासाठी चांगली मानली जातात. परंतु रॅंकिंग वेगवेगळ्या निकषांवर बदलू शकते. चला तर नाशिकमधील ५ इंजिनियरिंग कॉलेजची माहिती पाहुया:
सर विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SVIT):
चिंचोली, नाशिक येथे स्थित, SVIT हे एक नाशिकमधील प्रमुख अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. इथे खूपच चांगल्या दर्जाचे शिक्षण प्रदान केले जाते आणि नाशिकमध्ये या कॉलेजचे नाव आहे. येथे सरासरी वार्षिक शुल्क सुमारे रु. ९१,८६७१ आहे. (Engineering Colleges In Nashik)
(हेही वाचा – Kiran Pavaskar : उबाठाला कॉंग्रेसचा जाहिरनामा मान्य आहे का ? – किरण पावसकर)
संदिप युनिव्हर्सिटी:
नाशिकमधील टॉप ५ इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये संदिप युनिव्हर्सिटीचा क्रमांक लागतो. संदिप युनिव्हर्सिटी हे महाविद्यालय नाशिकमधील आणि नाशिक बाहेरील विद्यार्थ्यांचेही आवडते महाविद्यालय आहे. इथे विविध स्पेशलायझेशन कोर्स उपलब्ध आहेत, तसेच विविध बीटेक कोर्सेस सुद्धा प्रदान केले जाते. इथे सरासरी वार्षिक शुल्क रु. १,३०,०००० एवढे आहे. (Engineering Colleges In Nashik)
केके वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग एज्युकेशन ऍंड रिसर्च (KKWIEER):
विद्यार्थी मित्रांनो KKWIEER हे दर्जेदार शिक्षण देणारे महत्वाचे कॉलेज आहे. विशेष म्हणजे तुम्ही दुसर्या शहरातून इथे शिकण्यास येणार असाल तरी हे कॉलेज तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकते. कारण हे कॉलेज सुविधांसाठी ओळखले जाते. KKWIEER मधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी सरासरी वार्षिक शुल्क अंदाजे रु. १,३८,०००० आहे. (Engineering Colleges In Nashik)
सपकाळ नॉलेज हब (SKH):
सपकाळ नॉलेज हब नाशिकमध्ये अभियांत्रिकी शिक्षण देणारे आणि कमी शुल्क आकारणारे चांगले कॉलेज आहे. सरासरी वार्षिक शुल्क सुमारे रु ७७,३७७१ असून सुविधा देखील उत्तम आहे. इथला शैक्षणिक दर्जाची चांगला मानला जातो. नाशिकमध्ये कमी शुल्कातील चांगले कॉलेज शोधत असाल तर SKH हे तुमच्यासाठी योग्य कॉलेज आहे. (Engineering Colleges In Nashik)
SNJB अभियांत्रिकी महाविद्यालय:
कमी शुल्क आकारणारे आणखी एक महत्वाचे कॉलेज म्हणजे चांदवड, नाशिक येथे स्थित SNJB अभियांत्रिकी महाविद्यालय. हे कॉलेज चांगले शिक्षण आणि शिस्तीसाठी प्रसिद्ध आहे. सरासरी वार्षिक शुल्क अंदाजे रु. ८३,१९१ रुपये असून इथला परिसरही चांगला आहे. (Engineering Colleges In Nashik)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community