इंजिनीअरिंग करायचंय तर आता नो टेन्शन!

109

इंजिनीअरिंग करायचे म्हटले की मोठे शुल्क आकारले जात असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र आता इंजिनीअरिंग करायचे असल्यास चिंतेचे कारण नाही. कारण इंजिनीअरिंग शुल्क आता नियंत्रणात राहणार असून यापुढे दरवर्षी केवळ ५ टक्केच इंजिनीअरिंग शुल्कात वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे इंजिनीअरिंग महाविद्यालयांकडून भरमसाठ पद्धतीने वाढविल्या जाणाऱ्या शुल्कांना आता लगाम लागण्यास मदत होणार आहे.

शुल्क आकारणीचा निर्णय कधीपासून होणार लागू?

अखिल भारतीय अभ्यासक्रमांचे किमान शुल्क निश्चित केले आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) प्रथमच इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमांचे किमान वार्षिक शुल्क निश्चित केले आहे. त्यानुसार पदवी अभ्यासक्रमांचे किमान वार्षिक शुल्क ७९ हजार रुपये तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे किमान वार्षिक शुल्क १.४१ लाख रुपये असेल. शुल्क आकारणीचा निर्णय २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे.

(हेही वाचा – कोल्हापुरचा गडी पैलवान पृथ्वीराज पाटीलनं पटकावलं ‘महाराष्ट्र केसरी’चं अजिंक्यपद!)

इंजिनीअरिंग आणि मॅनेजमेंट सायन्स अभ्यासक्रमांचे शुल्क निश्चित करण्यासाठी सरकारने २०१५ मध्ये माजी न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली एका समतिची स्थापना करण्यात आली होती. या समितीने ४ वर्षीय अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे (बीटेक व बीई) कमाल वार्षिक शुल्क ग्रामीण भागासाठी १.४४ लाख रुपये, तर शहरी भागातील कॉलेजांसाठी १.५८ लाख रुपये निश्चित केले होते. मात्र न्या. श्रीकृष्ण समितीने किमान शुल्क निश्चित केले नव्हते.

कसे असणार शुल्क?

  • पदवी (बी टेक) : कमाल वार्षिक शुल्क : १.८९लाख रुपये
  • पदव्युत्तर (एम टेक) कमाल वार्षिक शुल्क : ३.०३ लाख रुपये

मिळालेल्या माहितीनुसार, शुल्कात दरवर्षी ५ टक्के वाढ करण्याचा अधिकार इंजिनीअरिंग महाविद्यालयांना देण्यात आला आहे. एआयसीटीईद्वारा संचलित सर्व इंजिनीअरिंग कॉलेजांना ही शुल्करचना लागू असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.