Engineers Day 2024 : या कारणासाठी साजरा केला जातो राष्ट्रीय अभियंता दिन

354
Engineers Day 2024 : या कारणासाठी साजरा केला जातो राष्ट्रीय अभियंता दिन
Engineers Day 2024 : या कारणासाठी साजरा केला जातो राष्ट्रीय अभियंता दिन

आपल्या देशात दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा केला जातो. महान अभियंता आणि भारतरत्न आणि ब्रिटिश नाइटहूड पुरस्कार प्राप्त एम. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. एम. विश्वेश्वरय्या यांचे पूर्ण नाव मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या असून त्यांना भारताचे पहिले अभियंता म्हटले जाते. (Engineers Day 2024)

एम. विश्वेश्वरय्या हे जगातील सर्वोत्तम अभियंत्यांपैकी एक मानले जातात. या महान अभियंत्याला आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी त्यांची जयंती राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून १५ सप्टेंबर हा राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. अभियंता दिनाद्बारे आपल्याला तांत्रिक नवकल्पना आणि अभियांत्रिकीच्या मदतीने आपण आगामी आव्हाने कशी सोडवू शकतो, यासाठी प्रोत्साहित केले जाते.  (Engineers Day 2024)

(हेही वाचा- DD National : भारताची सार्वजनिक प्रसारण सेवा : दूरदर्शनला 65 वर्ष पूर्ण)

कोणत्याही देशाच्या विकासात अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची असते. देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अभियंत्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताव्यतिरिक्त, श्रीलंका आणि टांझानियामध्ये १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिवस साजरा केला जातो. (Engineers Day 2024)

एम विश्वेश्वरय्या (M Visvesvaraya) यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी झाला. आपल्या गावी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी पुण्यातील कॉलेज ऑफ सायन्समधून त्यांनी सिव्हिल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा केला. ते पूर आपत्ती व्यवस्थापन आणि सिंचन तंत्रात तज्ञ होते. त्यांनी अनेक धरणे, पूल आणि पाणी वितरण प्रकल्पांची रचना केली, ज्यामुळे भारतातील कृषी आणि औद्योगिक विकासाला गती मिळाली. मुंबईच्या बंदर परिसरात पुराचा सामना करण्यासाठी त्यांनी ड्रेनेज सिस्टमची रचना केली. देशात तंत्रशिक्षणाचा प्रसार करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. (Engineers Day 2024)

(हेही वाचा- S Jaishankar : एस. जयशंकर यांनी नाव न घेता राहुल गांधींना लगावला टोला, म्हणाले…)

एम विश्वेश्वरय्या (M Visvesvaraya) यांना १९५५ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला. याशिवाय त्यांना ब्रिटिश नाइटहूड पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. अभियंता दिन साजरा करण्याची सुरुवात १९६७ मध्ये झाली. अभियंता दिनाचे उद्दिष्ट विद्यार्थी आणि तरुणांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये करिअर करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे.  (Engineers Day 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.