EPFO मध्ये तुमचं अकाऊंट तर नाही ना? २८ कोटी खातेधारकांचा डेटा लीक

153

EPFO मध्ये तुमचं अकाऊंट आहे का, तुम्ही कर्मचारी निर्वाह निधी संघटनेचे सदस्य असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईपीएफओच्या जवळपास २८ कोटी खातेधारकांची माहिती लीक झालाचा दावा एका रिपोर्टमधून उघड झाला आहे. यामध्ये आधार कार्ड क्रमांकापासून बँक अकाऊंट संदर्भातील माहितीचा समावेश असल्याने EPFO च्या सदस्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

दोन आयपी अॅड्रेसवरुन खातेधारकांची माहिती लीक

भारतातील पीएफ खातेधारकांसाठी युक्रेनच्या सायबर सिक्युरिटी रिसर्चर बॉब डियाचेंको (Bob Diachenko) याने केलेला दावा धक्कादायक आहे. त्याने जाहीर केलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट रोजी दोन वेगवेगळ्या आयपी अॅड्रेसवरुन पीएफ खातेधारकांची महत्वाची माहिती लीक झाली आहे. यामधील एका आयपी अॅड्रेसवरुन २८,०४,७२,९४१ खातेधारकांची माहिती लीक झाली आहे. तर आणखी एका आयपी अॅड्रेसवरुन ८३,९०,५२४ खातेधारकांची माहिती लीक झाल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा – BEST ची ‘Hop on- Hop off’ बस सेवा आता CSMT वरून सुरू)

ही माहिती झाली लीक

असेही सांगितले जात आहे की, पीएफ खातेधारकांचा जो डेटा सार्वजनिक करण्यात आला आहे. यामध्ये खातेधारकाचा UAN क्रमांक, नाव, आधार कार्ड डिटेल्स, बँक अकाऊंट नंबर आणि नॉमिनीचे डिटेल्स देखील लीक करण्यात आले आहेत. रिपोर्टनुसार दोन्ही आयपी अॅड्रेस Azure होस्टेड आणि भारतातीलच आहेत. तर CERT-In ने ट्विटला प्रतिक्रिया देत लीक बाबत त्याच्याकडे असलेली माहिती ई-मेलद्वारे मागवली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.