भारतीय संस्कृतीच्या विविध अंगांचे दर्शन घडवणारे 7 चित्रपट इटर्नल संस्कृती फिल्म फेस्टिवल (Eternal Sanskriti Film Festival) मध्ये दाखवण्यात येणार आहेत. 24 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत फिरोदिया एमपी थिएटर, द भांडारकर ओरिएन्टल इंस्टीट्यूट, पुणे येथे हा चित्रपट महोत्सव (Eternal Sanskriti Film Festival) होणार आहे.
श्री फिरोदिया ट्रस्ट आणि देश आपणायन फाऊंडेशन अँड विशुद्धी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपट महोत्सवाचे (Eternal Sanskriti Film Festival) आयोजन करण्यात आले आहे. या चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणारे सातही चित्रपट दीपिका कोठारी यांनी दिग्दर्शित केले आहेत.
(हेही वाचा Torres Scam : टोरेसच्या गुंतवणूकदारांची रक्कम हवाला मार्फत विदेशात पाठवली, हवाला ऑपरेटरला अटक)
कोणते चित्रपट कधी दाखवणार?
- वैकुंठ विष्णु तिब्बत से खजुराहो – 24 जानेवारी
- संस्कृति की अविरल धारा – 25 जानेवारी
- भारत प्रकृती का बालक – 26 जानेवारी
- मंदिर विविधता मे एकता – 27 जानेवारी
- भारत पर आक्रमण और प्रतिरक्षा – 28 जानेवारी
- भारत वैभव से विप्पनता – 29 जानेवारी
- योग का इतिहास – 30 जानेवारी
Join Our WhatsApp Community