European Nation: पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणार ‘हे’ ३ देश, कारण काय ?

नार्वेने ही घोषणा केल्यानंतर आयर्लंडचे पंतप्रधान सिमॉन हॅरिस यांनीही पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची घोषणा केली.

69
European Nation: पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणार 'हे' ३ देश, कारण काय ?

नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेन या ३ देशांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणार असल्याचे म्हटले आहे. या तिन्ही देशांतून इस्रायलने आपले राजदूर बोलावले आहेत शिवाय या घडामोडींमुळे इस्रायलला मोठा धक्का बसला असला, तरी मध्य पूर्वेतील शांततेसाठी आपण हे पाऊल उचलले आहे, असे या तीन देशांचे म्हणणे आहे. (European Nation)

यावर नॉर्वेचे पंतप्रधान जोनास घर स्टोर म्हणाले की, २ राष्ट्रांचा पर्याय हाच इस्रायलच्याही हिताचा आहे. त्यामुळे आम्ही २८ मे रोजी पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. जर ही मान्यता दिली नाही, तर मध्य पूर्वेत कधीही शांतता नांदणार नाही. इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या नागरिकांना चांगला राजकीय उपाय देणारा पर्याय द्यावा लागेल. शांतता आणि सुरक्षा असलेले दोन्ही शेजारी राष्ट्र हाच याला पर्याय आहे. (European Nation)

(हेही वाचा – Pune Car Accident: सत्र न्यायालयाचा निकाल, विशाल अग्रवाल याला २४ मे पर्यंत पोलिस कोठडी)

‘हा’ एकमेव पर्याय
ते म्हणाले, ”युरोपीयन राष्ट्रांची स्वतंत्र पॅलेस्टाईन राष्ट्राला सहमती, अशी मान्यता देणे म्हणजे पॅलेस्टाईनमधील मध्यम मार्गी शक्तींना पाठबळ देणे असे आहे, सततच्या संघर्षामुळे पॅलेस्टाईनमधील मध्यम मार्गी नेतृत्व मागे फेकले गेले आहे. पॅलेस्टाईनला मान्यता दिली नाही, तर मध्य पूर्वेत कधीही शांतात नांदणार नाही. या युद्धात हजारो लोक मारले गेले आहेत, त्यामुळे जो एकमेव पर्याय आहे, तो आपल्याला जीवित ठेवला पाहिजे.”

पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची घोषणा
नार्वेने ही घोषणा केल्यानंतर आयर्लंडचे पंतप्रधान सिमॉन हॅरिस यांनीही पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची घोषणा केली. ते म्हणाले, ”आर्यलँड, नॉर्वे आणि स्पेन पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता देणार आहोत. इतरही देश आमची भूमिका उचलून धरतील अशी अपेक्षा आहे.” तर स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सॅनचेज यांनी पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यात देणार असल्याचे म्हटले आहे. स्पेन हा निर्णय २८ मे रोजी घेणार आहे. पेड्रो यांनी संसदेत इस्रालयचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या कार्यपद्धतीवर टीकाही केली. माल्टा आणि सोल्हेनिया हे देशही लवकर पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता देणार असल्याचे, अल जझिरा या वृत्त वाहिनेने म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.