पुरुषांनो सावधान! तुम्ही महिलांकडे एकटक तर बघत नाही ना? नाहीतर…

पुरूषांनो… तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला माहिती आहे का… की कोणत्याही पुरूषाने कोणत्याही मुलीकडे किंवा महिलेकडे १४ सेकंदांपेक्षा जास्त वेळ पाहणे देखील गुन्हा आहे. कोणत्याही पुरूषाने जाणून-बाजून किंवा नकळत, थट्टा-मस्करी करूनही कामाच्या ठिकाणी तुमच्या महिला मैत्रिणी आणि महिला सहकाऱ्यांसह अशी कृत्ये करणे हा भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ आणि कलम ५०९ नुसार गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे थोडं जपून…

या राज्यात कायद्याची अंमलबजावणी 

असे कोणतेही कृत्य हे छेडछाड म्हणजेच eve teasing अंतर्गत येतात. त्यामुळे आता कोणत्याही मुलींकडे १४ सेकंद पाहणे हे देखील गुन्ह्याच्या श्रेणीत आले आहे. सार्वजनिक आणि खासगी आयुष्यात अनेकदा मुलांनी मुलींकडे एकटक पाहणे किंवा पाठलाग करणे अशा घटना घटतात. केरळमध्ये २०१६ मध्ये अशा कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. या तरतुदीनुसार कोणत्याही मुलीकडे १४ सेकंदांपेक्षा जास्त वेळ टक लावून पाहणे हा देखील गुन्हा आहे.

(हेही वाचा – LPG गॅस सिलिंडरवरील ‘या’ आकड्यांचा अर्थ तुम्हाला माहितीये का? दडली आहे महत्त्वाची माहिती)

कमीत कमी किती होणार शिक्षा

‘छेडछाड’ (eve teasing) हा शब्द भारतीय कायद्यात वापरला जात नाही. भारतीय दंड संहितेचे कलम २९४ a आणि b यांचा आधार पीडित महिला घेतात. यानुसार अश्लील हावभाव, महिलांसाठी गाणी गाणे इत्यादी गुन्ह्यांसाठी दोषी ठरलेल्या व्यक्तिला कमाल ३ महिन्यांची शिक्षा होते. तर भारतीय दंड संहिता कलमांतर्गत, महिला किंवा तरुणीविरुद्ध अश्लील कृत्ये, अश्लील हावभाव किंवा अश्लील शेरेबाजी करणाऱ्यांना एक वर्षांपर्यंत सश्रम कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here