‘लालपरी’च्या संपानंतरही एसटीच्या २१० बसफेऱ्या बंदच!

117

सहा महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला असतानाही अमरावतीतील कित्येक गावांमध्ये बससेवा अद्यापही सुरळीत नसल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी नियमित असलेल्या एसटीच्या २१० फेऱ्या बंदच असून सद्यस्थितीत १२९० बसफेऱ्या सुरू आहेत. त्यामुळे बंद असलेल्या फेऱ्या केव्हा सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

बस फेऱ्या कधी सुरू होणार? प्रवासी प्रतिक्षेत

राज्य परिवहन अमरावती महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सलग सहा महिने संप पुकारला होता. अगोदर कोरोनामुळे बसेस बंद होत्या त्यानंतर संपामुळे बस सेवा ठप्प झाली होती अशातच आता संप मिटला असून लालपरीच्या फेया पूर्वपदावर येत आहेत. जिल्ह्यातील ८ आगारांमधून १२९० फेऱ्या आजघडीला सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे अजूनही ग्रामीण भागातील १७८ व मानवविकासच्या ३२ अशा २१० बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे या बस फेऱ्या कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(हेही वाचा- पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणं भोवलं, केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी)

संप मिटताच प्रवाशांना दिलासा पण…

गेले सहा महिने बसेस बंद असल्यामुळे प्रवाशांना दामदुपटीने पैसे मोजून खासगी वाहनाने प्रवास करावा लागला होता. अशातच एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटताच प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. शाळांना उन्हाळी सुटी आहे. त्यामुळे मानव विकासच्या बसफेऱ्या बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या लग्नसराईचा सिझन असल्याने एसटी बसेसही हाऊसफुल्ल धावत आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातील गावात जाणाऱ्या एसटी बसेसच्या २१० फेऱ्या बंद आहेत. त्यामुळे बंद फेऱ्या सुरु करण्याची मागणी होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.