‘भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती ‘हिंदू’च आहे’, सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान! अखंड भारताचाही केला उल्लेख

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी एक मोठे विधान केले आहे. भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती ही हिंदू असून अखंड भारतातील सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे, असे स्पष्ट मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. छत्तीसगड येथील स्वयंसेवकांच्या कार्यक्रमाला संबोधित करताना भागवत यांनी हे विधान केले आहे. तसेच कोणताही धार्मिक विधी करण्याची पद्धत बदलण्याची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

प्रत्येक भारतीय हा ‘हिंदू’

भारताला फार मोठा प्राचीन असा इतिहास लाभला आहे. संपूर्म जगात हिंदू धर्म ही एकमेव संकल्पना आहे, जी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्यास शिकवते आणि त्यावर विश्वास ठेवते. जे लोक भारताला आपली मातृभूमी मानतात आणि विविधतेने नटलेल्या भारतात एकतेच्या संस्कृतीवर विश्वास ठेऊन एकत्र राहू इच्छितात, ते सर्व हिंदूच आहेत. त्यांचा धर्म,संस्कृती,भाषा खाण्यापिण्याच्या सवयी किंवा त्यांची वाचारसरणी काहीही असली तरी सर्व भारतीय हिंदूच आहेत. हे आपण सातत्याने ठामपणे सांगत आलो आहे, असे मोहन भागवत यांनी स्पष्ट केले आहे.

(हेही वाचाः श्रद्धाची हत्या नेमकी झाली कधी? मित्राच्या दाव्याने वाढला संभ्रम)

अखंड भारतातील प्रत्येकाचा डीएनए समान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य हे वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्य घडवून लोकांमध्ये आकता प्रस्थापित करण्यासाठी आहे. 40 हजार वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या अखंड भारतातील सर्व भारतीयांचा डीएनए हा समान आहे, असेही मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here