नुपूर शर्मा यांना बंदूक बाळगण्याचा परवाना; दिल्ली पोलिसांची माहिती

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना बंदुकीचा परवाना मिळाला आहे. प्रेषित मोहंम्मद पैंगबर यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरुन झालेल्या नाजारीनंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. कट्टरपंथीयांकडून ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याने त्यांनी बंदूक परवान्यासाठी अर्ज केला होता.

दिल्ली पोलिसांच्या एका अधिका-याने गुरुवारी याला दुजोरा दिला. 2022 च्या मध्यात, नुपूर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत प्रेषित मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा विरोध झाला होता. नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी देशात अनेक भागांत हिंसक निदर्शने झाली होती.

(  हेही वाचा: नाशिकमध्ये भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती )

नेमके प्रकरण काय?

गेल्या वर्षी नुपूरने एका टीव्ही चॅनलच्या चर्चेदरम्यान प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती, त्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर आखाती देशांमधून विरोध करण्यात आला होता. मुस्लीम देशांनी एक निवेदन जारी करून भाजप प्रवक्त्यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि त्याचा तीव्र निषेध केला. हे लक्षात घेऊन भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले होते. या वक्तव्याबाबत देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसाचार झाला होता.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here