गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामतांनी श्री सिद्धिविनायकाला काय घातलं साकडं?

108

गोव्यात काँग्रेस पक्षाचे बहुमताचे सरकार येऊ दे, असे साकडे काँग्रेसचे जेष्ठ नेते व गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज श्री सिद्धिविनायकला घातले. कामत यांनी सहकुटुंब सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले.

मंदिर न्यासाकडून स्वागत

दिगंबर कामत यांनी राजकीय कारकीर्दीत गोव्याच्या मुख्यमंत्री पदासह विविध पदांवर काम केले आहे. एक कुशल व अंतर्मुख राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी समाजातील तळागाळातील लोकांसाठी सदैव काम केले. गोव्यातील मडगाव मतदार संघाचे त्यांनी अनेक वर्षांपासून प्रतिनिधीत्व केले आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतुन वेळ काढत आज त्यांनी श्री सिद्धिविनायक गणपतीचे आशिर्वाद घेतले. यावेळी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे सर्वश्री विश्वस्त व कॉंग्रेस नेते राजाराम देशमुख यांनी कामत यांना गणपती बाप्पाचा फोटो भेट देऊन त्यांचे स्वागत केले.

(हेही वाचा वरळी कोळीवाड्यासाठी वरळी किल्ल्याची डागडुजी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.