महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे प्राचार्य काशिनाथ भोईर यांना यावर्षीचा राज्य स्तरावरचा ‘मेस्टा’चा ‘एक्स्लंट प्रिंन्सिपाॅल आवार्ड’ मिळाला आहे. गुरुवार, 5 जानेवारी रोजी नेहरू विज्ञान केंद्र, वरळी मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘मेस्टा’ ही राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे आणि संस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारी एक अग्रगण्य संघटना आहे. त्यांनी दिलेला पुरस्कार शिक्षण क्षेत्रात मानाचा समजला जातो. ‘मेस्टा’चे दोन दिवसीय वार्षिक अधिवेशन मुंबईत नेहरु विज्ञान केंद्र, वरळी येथे पार पडले. अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांतील नामांकित शाळांच्या प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि संस्थाचालकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. ‘मेस्टा’चा मानाचा पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे प्राचार्य काशिनाथ भोईर यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, संचालक रणजित सावरकर, सर्व शिक्षक, कर्मचारी आणि पालकांनी प्राचार्य भोईर यांचे अभिनंदन केले.
(हेही वाचा भाजपाचे ‘मिशन २००’ जोरात; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला काँग्रेस आमदार…)