केंद्र सरकारने कोरोनाग्रस्त 2020-2021 वर्षांत दोनदा उत्पादन शुल्कात वाढ केल्यामुळे केंद्राला मिळणा-या महसुलात मोठी वाढ झाली आहे. मागच्या दोन वर्षांत पेट्रोल- डिझेलवर केलेल्या उत्पादन शुल्काच्या महसुलातून केंद्राने दुप्पट कमाई केली आहे. एप्रिल 2020 ते मार्च 2021 मध्ये या उत्पादन शुल्कात दुपटीने वाढ झाली असून केंद्राने 3.72 लाख कोटी रूपयांचा महसूल मिळाला आहे. यानुसार, एक लीटर पेट्रोल- डिझेलच्या किमतीमधील किती पैसे सरकारच्या खिशात जातात हे अर्थ मंत्रालयाने लोकसभेत सांगितले आहे. केंद्र सरकार एक लीटर पेट्रोलवर 27.90 रुपये आणि एक लीटर डिझेलवर 21.80 रुपये एक्साईज ड्यूटी घेते.
एक लीटर पेट्रोलमागे एवढी कमाई
सविस्तर माहिती मंत्रालयाने दिली आहे, प्रति लीटर पेट्रोलसाठी 1.40 रुपये बेसिक एक्साईज ड्यूटी, 11 रुपये अतिरिक्त एक्साईज ड्यूटी, 13 रुपये रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस, आणि 2.5 रुपये कृषी आणि विकास इन्फ्रास्ट्रक्चर सेसच्या रुपात घेतले जातात. ही एकूण किंमत 27.90 रुपये होते.
उत्पादन शुल्कात केली कपात
केंद्र सरकारला मिळणा-या इंधनावरील कर महसूलातून राज्यांना केवळ मूळ उत्पादन शुल्कातून हिस्सा दिला जातो. आर्थिक वर्ष 2020-2021 मध्ये केंद्राने गोळा केलेल्या महसुलातून राज्य सरकारांना 19 हजार 972 कोटी रुपये देण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढल्याने देशांतर्गत बाजारात पेट्रोल डिझेलच्या दराने शंभरी गाठल्याने चालू महिन्यात केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली आहे. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कामध्ये 5 रुपये,तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयांनी कमी केले आहे.
(हेही वाचा :देशाची अर्थव्यवस्था सुधारतेय! जीडीपी एवढ्या टक्क्यांनी वाढला )
Join Our WhatsApp Community