मानेवर बसलेले भूत काढण्यासाठी मांत्रिकाने मुलीसोबत केले ‘हे’ कृत्य

भूत उतरवल्याशिवाय मानेचे दुखणे बरे होणार नाही, असे मांत्रिकाने मुलीच्या आईला सांगितले. आणि...

मानदुखीवर उपाय करण्यासाठी एका मांत्रिकाकडे गेलेल्या १६ वर्षीय मुलीला मेलेल्या काकाचे भूत मानेवर बसले आहे, ते उतरवण्यासाठी अघोरी उपाय करावा लागेल, असे सांगून मांत्रिकाने मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल करुन मंत्रिकासह तिघांना अटक केली आहे.

मानदुखीवर सांगितला उपाय

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील १६ वर्षीय मुलीचे मानेचे दुखणे औषधोपचार करुन देखील बरे होत नव्हते. या मुलीला मंत्रिकाकडे घेऊन जाण्यास तिच्या आईला काही जणांनी सुचवले होते. आई मुलीला घेऊन पडघा येथील घोलबाव येथे असणा-या ६१ वर्षीय मांत्रिक शांताराम शेळकेकडे घेऊन गेली होती.
मांत्रिकाने मुलीला बघून मुलीच्या मानेवर तिच्या मृत काकाचे भूत बसले आहे म्हणून तिची मान दुखत आहे, भूत उतरवल्याशिवाय मानेचे दुखणे बरे होणार नाही, असे मांत्रिकाने मुलीच्या आईला सांगितले.

(हेही वाचाः भयानक! बेपत्ता आई आणि मुलाच्या वहीत सापडले असे काही, ज्यामुळे…)

जंगलात घेऊन गेला आणि…

आईने उपाय करण्यास परवानगी देताच, मांत्रिक आणि त्याचे चेले मुलीला आणि आईला घेऊन जवळच्या जंगलात गेले. त्याचे चेले आणि मुलीच्या आईला एका ठिकाणी उभे करुन मांत्रिक शांताराम शेळके मुलीला घेऊन जंगलाच्या आत घेऊन गेला आणि मुलीवर अंगारा धुपारा टाकून तिला विवस्त्र करुन त्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.

आईवरही गुन्हा दाखल

त्यानंतर मुलीला आणि तिच्या आईला मांत्रिक आणि त्याच्या चेल्यांनी याबाबत कुठेही वाच्यता करू नका, अशी धमकी दिली. मांत्रिकाने केलेल्या अत्याचारामुळे मुलीला त्रास सुरू झाल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी मांत्रिक, त्याचे इतर दोन चेले आणि हे प्रकरण दडवून ठेवल्याप्रकरणी मुलीच्या आईवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

(हेही वाचाः प्रेयसीच्या पतीला पळवून लावण्यासाठी त्याने रचला खतरनाक कट!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here