मुंबई महापालिकेच्या दादर येथील प्रमोद महाजन कला पार्क उद्यान आणि जोगेश्वरी पूनम नगर येथील शिल्पग्राम या उद्यानाच्या देखभालीसाठी पुढील दोन वर्षांकरता कंत्राटदारांची नेमणूक करण्यात येत आहे. या दोन्ही उद्यानांच्या देखभालीसाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
या कामासाठी २ कोटी ७९ लाख ८७ हजार होणार खर्च
दादर येथील प्रमोद महाजन पार्क उद्यानाची उभारणी करण्यात आल्यानंतर, येथील देखभालीसाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली होती. या कंत्राटदाराचा कालावधी मागील जुलै २०२१ संपुष्टात आली आहे. त्यामुळे या उद्यानाच्या पुढील देखभाल व दुरुस्ती करता दोन वर्षांकरिता कंत्राटदारांची नेमणूक करण्याकरता निविदा मागवण्यात आली होती. या निविदेमध्ये एच.व्ही. कन्ट्रक्शन या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून पुढील दोन वर्षांची देखभाल व दुरुस्ती केली जाणार आहे. या कामासाठी २ कोटी ७९ लाख ८७ हजार एवढा खर्च केला जाणार आहे. महापालिकेने अंदाजीत केलेल्या दरापेक्षा या कंत्राटदाराने उणे ३९.९९ एवढ्या दराने निविदा भरत हे काम मिळवले होते.
(हेही वाचा – मुंबईच्या मालमत्ता कर वसुलीवर निवडणुकीचे सावट, तरीही…)
नव्याने देखभाल-दुरुस्तीसाठी कंत्राटदाराची नेमणूक
तर जोगेश्वरी पूनम नगर येथे उभारण्यात आलेल्या शिल्पग्राम या उद्यानाच्या देखभालीसाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे याठिकाणीही नव्याने देखभाल-दुरुस्ती करता कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येत आहे. या कंत्राटदाराने महापालिकेच्या निविदेतील अंदाजापेक्षा उणे ४३.५४ टक्के या दराने निविदा भरत कमीत काम मिळवण्याचा प्रयत्न केला. या दोन वर्षांच्या कामांसाठी २ कोटी १६ लाख ११ हजार रुपये एवढा खर्च केला जाणार आहे.
Join Our WhatsApp Community