‘वर्क फ्रॉम होम’ करताय? मग तुमच्यासाठी आहे आनंदाची बातमी…

163

गेल्या दीड ते दोन वर्षापासून देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मुलांच्या शाळा, महाविद्यालये ते नोकरीपर्यंत अनेक मोठे बदल झाल्याचे दिसून आले. प्रत्यक्ष काम न करता सर्व ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या व्यवहारावर सर्वाधिक भार देण्यात आला. त्यातच सरकारी कंपन्यांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज होत आहेत तर काही खासगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिली आहे. पण ‘वर्क फ्रॉम होम’च्या या वाढत्या ट्रेंडमुळे नोकरदार वर्गाचे अनेक खर्च वाढल्याचे समोर आले आहे. जसे की इंटरनेट, टेलिफोन, मोबाईल आणि वीज बिलांत मोठी वाढ झाली आहे. असे असले तरी आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही कारण यंदाच्या अर्थसंकल्पातून तुम्हाला आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

असा मिळणार दिलासा

या अर्थसंकल्पात ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला सरकारकडून विशेष दिलासा देण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत, यावेळी वर्क फ्रॉम होमसाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम करप्राप्त रकमेतून वजावट म्हणजेच Work from home allowance म्हणून मिळण्याची शक्यता आहे.

जर अर्थमंत्र्यानी या मागणीचा विचार केला तर…

कर सेवा आणि आर्थिक सेवा देणाऱ्या Deloitte India या कंपनीने नोकरदारांना ‘वर्क फ्रॉम होम’ भत्ता देण्याची मागणी केली होती. जर सरकार थेट भत्ता देऊ शकत नसेल, तर आयकरात सूट देण्याची तरतूद करा, असे या मागणीत कंपनीने सांगितले आहे. जर अर्थमंत्र्यांकडकडून या मागणीचा विचार झाल्यास घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करप्राप्त रकमेत 50 हजार रुपयांपर्यंत वजावट मिळू शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.