Veer Savarkar : ‘स्वातंत्र्यवीर लाईट अँड साऊंड शो’द्वारे अनुभवा वीर सावरकरांचा जीवनपट

39
'स्वातंत्र्यवीर लाईट अँड साऊंड शो’द्वारे अनुभवा वीर सावरकरांचा जीवनपट
'स्वातंत्र्यवीर लाईट अँड साऊंड शो’द्वारे अनुभवा वीर सावरकरांचा जीवनपट

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक निर्मित ‘स्वातंत्र्यवीर’ हा भव्य, नाविन्यपूर्ण उपक्रम लाईट अँड साऊंड शो (Light and Sound Show) पावसाळ्यानंतर पुन्हा सुरू झाला आहे. हा शो आता आठवड्यातून २ दिवस शनिवार आणि रविवार या दिवशी दाखविण्यात येणार आहे. या शोच्या माध्यमातून वीर सावरकरांचा (Veer Savarkar) जीवनपट जाणून घेता येईल. ‘स्वातंत्र्यवीर’ हा शो स्मारकासाठी नव्हे, तर साऱ्या देशासाठीच एक मानबिंदू आहे. वॉलमॅपिंग तंत्रज्ञानावर आधारित हा भारतातील पहिला कायमस्वरूपी आणि व्यक्तीचित्रणात्मक असा भव्य शो आहे. या ‘लाईट अँड साऊंड शो’मुळे केवळ मुंबईचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची मान सन्मानाने उंचावली आहे.

(हेही वाचा – मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत आता ‘Artificial Intelligence’ चा वापर)

असा आहे ‘लाईट अँड साऊंड शो’

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या दर्शनी भागात ६६ फूट x ९४ फूट भिंतीवर हा कार्यक्रम दाखविला जातो. यासाठीचा प्रोजेक्टर २७ फूट उंचीवरील एका मनोऱ्यात ठेवण्यात आला आहे. प्रेक्षकांना बसण्यासाठी तात्पुरती गॅलरी उभारण्यात आली असून एका वेळेला १५० प्रेक्षक हा कार्यक्रम बघू शकतात. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रखर राष्ट्राभिमानी, क्रांतीकारक, संवेदनशील कवी, लेखक होतेच पण द्रष्टेही होते आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे पुरस्कर्तेही होते. त्यामुळे त्यांच्यावरील कलाकृती साकारताना कला आणि तंत्रज्ञानाचा संगम असणे अत्यावश्यक होते.

New Project 96 1

बरोबर आठ वाजता हा शो सुरू होतो. तत्पूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भव्य पुतळा, त्याच्या दोन्ही बाजूला असलेली १८५७ च्या स्वातंत्र्य समरापासून स्वातंत्र्यापर्यंतच्या काल खंडावरील भित्तिशिल्पे पाहता येतील. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये सर्वच क्रांतिकारकांना ज्या यमयातना भोगाव्या लागल्या, त्याचे स्मरण करून देणारा कोलू, विविध प्रकारच्या बेड्याही अनुभवता येतील.

सावरकरांचे क्रांतिकार्य तरुण पिढीपर्यंत पोहचविणारी नेत्रदीपक कलाकृती

‘स्वातंत्र्यवीर’ या लाईट अँड साऊंडची शो ची संकल्पना आणि दिग्दर्शन, ‘लोकमान्य- एक युगपुरुष’ या अप्रतिम चित्रपटाचे तरुण दिग्दर्शक ओम राऊत यांची आहे. तर स्मारकाच्या या अतिशय आगळ्यावेगळ्या, महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि मंजिरी मराठे यांनी पेलली आहे. हा भव्य लाईट अँड साऊंड शो म्हणजे सावरकरांचे क्रांतिकार्य तरुण पिढीपर्यंत पोहोचविणारी एक आधुनिक आणि नेत्रदीपक कलाकृती आहे.

New Project 98 1

सावरकरांच्या आभासी प्रतिकृतीला वास्तविकतेची झालर येण्यासाठी कमालीचे व्हिज्युअल आणि साऊंड इफेक्ट्स दिले गेल्याने प्रेक्षकांसाठी हा शो नेत्रदीपक पर्वणी ठरेल यात शंकाच नाही. या शोच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील काही घटना आणि वीर सावरकरांचा जीवनपट उलगडण्यास मदत होईल.

कधी, कुठे पाहता येणार 3D मॅपिंग ध्वनी प्रकाश शो?

स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर
वार : शनिवार आणि रविवार
वेळ : रात्री ८.००
कालावधी : ४० मिनिटे
प्रवेश : विनामूल्य

विशेष आवाहन

आपल्या कौटुंबिक औचित्याच्या प्रसंगी, जीवनातील महत्त्वाच्या घटनांच्या निमित्ताने आप्तेष्टांसाठीही मागणीप्रमाणे या विशेष शोचे आयोजन करता येईल. त्यासाठी कृपया सावरकर स्मारकाशी संपर्क (संपर्क क्रमांक – ०२२ २४४६५८७७) साधावा.

त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना या माध्यमातून वीर सावरकरांच्या (Veer Savarkar) कार्याचा परिचय करून देता येईल. त्यासाठी शाळेच्या शिक्षकांनी क्षितीजा कुलकर्णी (संपर्क क्रमांक – ९३२२२१२५७७) यांच्याशी संपर्क साधावा.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.