वैधता संपलेली सौंदर्य प्रसाधने बाजारात, गुन्हे शाखेकडून पोलखोल

संगणकाच्या साहाय्याने सौंदर्य प्रसाधनांवर नवीन वैधता टाकली जाते

108
मुंबईसह राज्यातील अनेक ब्युटीशॉपमध्ये वैधता संपलेली सौदर्य प्रसाधनांची विक्री करून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करीत असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने समोर आणला आहे. गुन्हे शाखेने क्रॉफर्ड मार्केट, दाणा बाजार, त्याच बरोबर गोरेगाव, कांदिवली, घाटकोपर या ठिकाणी छापे टाकून कोट्यवधी रुपयांचे वैधता संपलेली सौंदर्य प्रसाधने जप्त केली आहेत. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे.

कॉम्युटरच्या सहाय्याने नवीन वैधता टाकली जाते

जप्त करण्यात आलेली सौंदर्य प्रसाधने ही मुंबई, ठाण्यासह राज्यातील काही ब्युटी पार्लर, तसेच लहान मोठे दुकानदारांना विकली जात असल्याची माहिती समोर येत आहे. गोरेगाव येथील ‘नॅशनल इम्पेक्स’ व ‘एम.एस. इंटरनॅशनल’ या कॉस्मेटीक व ब्युटी प्रॉडक्टच्या कंपनी दाणाबंदर आणि क्रॉफड मार्केट या ठिकाणी परदेशातील वैधता संपलेली ब्युटी प्रोडक्टस् वर कॉम्युटरच्या सहाय्याने नवीन वैधता टाकून त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या ब्युटी शॉप्समध्ये विक्री करतात आणि सामान्य ग्राहकांची फसवणूक करतात, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कक्ष- ११, कक्ष – १२ व कक्ष-८ मधील अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी तीन पथके तयार करण्यात आली होती. या पथकाने एकाच वेळी मुंबईतील  गोरेगाव, कॉफर्ड मार्केट व दाणा बंदर, घाटकोपर येथील गोदामावर छापा टाकून  वैधता संपलेली  परफेक्ट कॉस्मॅटिक, कलर झोन, पर्मनंट हेअर कलर, ग्लॅमर पर्मनन्ट हेअर कलर, बीओवूमेन प्रोफेशनल हेअर कलर इत्यादी प्रोडक्ट असा एकूण ३ कोटी २८ लाख ७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या सौंदर्य प्रसाधनांवरील वैधता संपलेली होती, तर काही वस्तूंवरील  वैधता खोडून संगणकाच्या सहाय्याने नवीन वैधता वाढविण्यात आल्याचे समोर आले.

गुन्हा दाखल करून एकाला अटक

वैधता संपलेल्या सौन्दर्य प्रसाधनाची दिनांक बदलून हे सौदर्य प्रसाधने  कॉफर्ड मार्केट, दी ब्युटी शॉप, ओम टॉवर्स, एस. व्ही. रोड, कांदिवली (प), फर्स्ट ब्युटी, एम. जी रोड, निर्मल कुंज, घाटकोपर (पु), या ठिकाणी विक्री करीत असल्याचे समोर आले आहे,  कॉफर्ड मार्केट येथील गोदामातून हा  माल विक्री करून मिळालेले १३ लाख १९ हजार रोख व १४ हार्डडिस्क, ०२ मोबाईल व ईतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी  गुन्हा दाखल करून एकाला अटक करण्यात आली असल्याची महिती पोलिसांनी दिली आहे. गोडाऊनचा तसेच ब्युटी शॉपचा  मालक याकुब उस्मान कापडिया (७८)  याला नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावनिण्यात आलेले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.