बांगलादेशातील चितगाव येथे ऑक्सिजन प्रकल्पात झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. सीताकुंडा परिसरातील या अपघातस्थळाच्या 2 चौरस किमी अंतरावरील इमारतींना देखील यामुळे हादरा बसला आहे.
( हेही वाचा : येत्या आठवड्यात बँका तीन दिवस राहणार बंद!)
यासंदर्भातील माहितीनुसार बांगलादेशातील चित्तगांवच्या सीताकुंडा परिसरात शनिवारी दुपारी ऑक्सिजन प्रकल्पात भीषण स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनस्थळी दाखल झाले. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचाव कार्य सुरू असून, या स्फोटात अनेकजण गंभीर जखमी झाल्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला ? यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती वर्तवली जात आहे. ऑक्सिजन प्रकल्पाच्या परिसरातील इमारतीही हादरल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.