नागपूर जीपीओ कार्यालयात एका पार्सलमध्ये असलेल्या ज्वलनशील पदार्थाचा स्फोट झाल्याची घटना १४ जूनला सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली आहे. हे पार्सल नाशिकवरून आले होते आणि वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे पाठवण्यात येणार होते. स्फोटकाचे सगळे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच असे ज्वलनशील पदार्थ पार्सलमधून पाठवता येतात का याचाही तपास केला जाणार आहे.
तपास सुरू
जनरल पोस्ट ऑफिस परिसरात विभागीय आयुक्त कार्यालय आणि मंत्र्यांचे बंगले सुद्धा आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे घर सुद्धा जीपीओ ऑफिसपासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. नाशिकवरून हे पार्सल वर्ध्याला पाठवण्यात आले होते. नागपूरच्या मुख्य पोस्ट ऑफिसच्या पार्सल हबमध्ये पोहोचल्यानंतर कर्मचारी त्याला हाताळत असताना त्यामध्ये स्फोट झाला. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
( हेही वाचा : राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेल्या ‘जलभूषण’ वास्तूचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन )
सीताबर्डी पोलीस स्थानकातील बॉम्ब शोधक पथक आणि घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी स्फोटके जप्त केली असून हे पार्सल कोणत्या उद्दिष्टाने पाठवण्यात आले होते याचा तपास सुरू आहे.
Join Our WhatsApp Community