अफगणिस्तानची राजधानी पुन्हा हादरली! काबूलमधील गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला

अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. काबूल येथील गुरुद्वारा कारते परवान येथे शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी अनेक स्फोट घडवून मोठा हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामिक स्टेटच्या (ISIS) दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या राजधानीतील गुरुद्वारामध्ये गोळीबार केला असून यामध्ये एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(हेही वाचा – मुंबईकरांनो पार्किंगचं ‘नो टेन्शन’! आता कुठेही गाडी उभी करण्याची गरज नाही)

अद्याप दहशतवाद्यांशी चकमक सुरू

काबूलमधील कर्ते परवान गुरुद्वारा समितीचे सदस्य तलविंदर सिंग चावला यांनी घटनास्थळाबाहेरील ताजी परिस्थिती सांगितली आहे. चावला यांनी सांगितले की, दहशतवादी अजूनही गुरुद्वारामध्येच आहेत. आमचे 7 ते 8 लोक तीन-चार तासांपासून बेपत्ता आहेत. 2 ते 3 लोकांना आतून बाहेर काढण्यात आले आहे. या सर्वांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काबूलमधील कारते परवान गुरुद्वारामध्ये हा गोळीबार झाला असून सध्या सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांशी चकमक सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

बघा व्हिडिओ

2020 गुरुद्वारा हल्ल्याची पुनरावृत्ती होणार, असा दिला इशारा

भाजपच्या नेत्याने पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर अशा हल्ल्याचा इशारा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या इस्लामिक स्टेट खोरासान (Islamic State Khorasan) प्रांताच्या मीडिया विंगने एक व्हिडिओ सादर केला. यामध्ये 2020 गुरुद्वारा हल्ल्याची पुनरावृत्ती होईल, असे म्हणत हा इशारा देण्याचे आल्याचे सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here