परळी वीज केंद्राजवळ स्फोटाचा कट उधळला, 103 जिलेटीन कांड्यांसह तिघेजण ताब्यात

117

बीड जिल्ह्यातील परळी औष्णिक विद्युत केंद्राजवळ स्फोटक साहित्य जप्त करून कट उधळला गेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी स्फोटाची तयारी करणाऱ्या या तिघांकडून 103 जिलेटीन कांड्या, 150 बॅटरी आणि इतर स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी परळी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून सखोल तपास करत आहेत.

(हेही वाचा – शिंदे गटातील ‘या’ बड्या नेत्याला कोरोना; ट्वीट करत दिली माहिती)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिसंवेदनशील परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात शनिवारी संध्याकाळी उशिरा सुरक्षा रक्षकांमुळे तीन जण संशयास्पद स्थितीत दिसले. यानंतर या तिघांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ 103 जिलेटीनच्या कांड्या सापडल्या.

ही माहिती तत्काळ परळी पोलीस ठाण्यात देण्यात आली. यानंतर पोलिसांनी या तिघांकडून जिलेटीनच्या कांड्यांशिवाय 150 बॅटरी आणि इतर स्फोटक साहित्य जप्त केले आहे. परळी पोलीस या तिघांकडून त्यांच्या हेतूची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.