दिल्लीत खळबळ! गाझीपूर फूल मार्केटमध्ये सापडली IED स्फोटकं

राजधानी दिल्लीतून एक मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे, दिल्ली पोलिसांनी एका बेवारस बॅगमधून IED जप्त केले आहे. शुक्रवारी सकाळी IED बॅग सापडल्यानंतर परिसर रिकामा करण्यात आला आहे. दिल्लीच्या गाझीपूर फुल बाजारात हे स्फोटक सापडले.

(हेही वाचा –धक्कादायक! थेट उपमुख्यमंत्र्यांच्या नावाखाली खंडणीचा फोन)

मिळालेल्या माहितीच्या आधारे आयईडी असलेली बेवारस बॅग जप्त केली आहे. तर बॉम्ब निकामी पथक गाझीपूर फुल मार्केटमध्ये दाखल झाले आहेत. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळ पोहचल्या आहेत. शिवाय स्पेशल सेल अधिकारी, नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) या विशेष दहशतवादी विरोधी दल, श्वान पथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान बॉम्ब निकामी पथकाकडून परिसराची तपासणी सुरु अशी माहिती दिल्ली पोलीस विभागाचे राकेश अस्थाना यांनी सांगितली.

असा घडला प्रकार

पूर्व दिल्लीतील गाझीपूर फूल मार्केटमध्ये एक बेवारस बॅग आढळून आल्याने खळबळ उडाली. याची प्रथम माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बॅग सापडलेला परिसर रिकामा केला. सकाळी 10.30 वाजता बॉम्बचा कॉल आला. त्यानंतर जेसीबी मागवण्यात आला. येथे खोल खड्डा खोदून बॉम्ब निकामी केल्याचे वृत्त समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास आता दिल्ली पोलिसांचे विशेष पथक करत आहे.

देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आधीच हाय अलर्टवर असलेल्या सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी करत बाजारपेठ रिकामी केली आहे. ही बॅग नेमकी कुठून आली कोणी ठेवली याचा तपास सध्या सुरु आहे. संशयास्पद बॅग सापडल्यानंतर पोलिसांनी इतर यंत्रणांनाही याबाबत सतर्क केले. यानंतर एनएसजीचे बॉम्बशोधक पथक, स्निफर डॉग आणि बॉम्ब तज्ञही घटनास्थळी पोहोचले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here